तुळजाभवानी मातेचे मंदिर.jpg
तुळजाभवानी मातेचे मंदिर.jpg 
मराठवाडा

तुळजाभवानी मंदिरातील नाणी गायबप्रकरणी दिलीप नाईकवाडीला अटक

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिरातील (Tuljabhavani Mata Temple) प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी मंदिर समितीचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना सोमवारी (ता.19) मध्यरात्री पोलीसांनी अटक केली आहे. या संदर्भात पोलीसांनी सांगितले की, तुळजाभवानी मंदिर समितीचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी (Tuljapur) यांनी ऐतिहासिक प्राचीन नाणी, 348 ग्रॅम सोने तसेच चांदीचा अपहार केला. या संदर्भात नाईकवाडी यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या नाण्यांची नोंद 1980 पर्यत होती. तथापि 2005 ते 2018 मध्ये करण्यात (Osmanabad) आलेल्या पंचनाम्यात 71 नाण्यांसह सोने चांदीच्या वस्तु गायब झाले असल्याचे दिसून आले. या संदर्भात नाईकवाडी यांना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात येथील तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी त्यांचे वकील अॅड शिरीष कुलकर्णी यांच्यामार्फत लेखी तक्रार तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे केली होती. या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांत 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 9 मे 2019 रोजी लेखी तक्रार केली होती. नाईकवाडी हे कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कारकिर्दीत नाईकवाडी यांनी ऐतिहासिक नाणे तसेच सोन्या चांदीच्या वस्तु गायब केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंजूम शेख करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT