file photo
file photo 
मराठवाडा

कोणाला मतदान करणार म्हणून एकास गंगाखेडमध्ये मारहाण

सकाळ वृत्तसेवा

गंगाखेड (जि.परभणी) : मतदान करण्याच्या कारणावरून गंगाखेड शहरात एकास राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना शनिमंदीर परिसरातील मतदान बुथवर सोमवारी (ता.21) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान मारहाणीची घटना घडत असतांना पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.  

गंगाखेड शहरातील तारु मोहल्ला या भागात शनीमंदिर परिसरातील येथील मतदान केंद्रावर मतदाराला मत कोणाला करणार असे विचारण्यावरून सय्यद लाला नामक व्यक्तीने मी गोपनीय मतदान करणार आहे कोणालाही सांगणार नाही असे म्हणताच बुथवरील असलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यकरतयानी मारहाण करण्यास सुरूवात केली.

ही घटना उपस्थित पाहत आसताना व मतदार येथील कोणाला मतदान करणार अशी विचारणा करत आहेत म्हणुन संतप्त झाले. नाही सांगीतले तर मारहान करत आहेत. म्हणुन मतदार आक्रमक झाल्याचे दिसुन आले. या मुळे मतदानाला आलेल्या काही महीला व पुरुष मतदार वातावरण तनावपुर्ण झाल्याने निघुन गेले.

घटनेनंतर सय्यद लाला यास मारहाण झाल्याने त्याचे समर्थक ही आक्रमक झाले होते. या घटनेने येथील मतदान प्रक्रिया काही वेळ विष्कळीत राहीली. मतदान केंद्राच्या बाहेर तनाव कायम होता. मात्र ही घटना घडत आसताना पोलीसांनी हस्तक्षेप करण्याचे टाळले म्हणुन पोलीसावर ही उपस्थित नागरिकांनी रोष व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT