मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत आहे  Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध; जिंतूर येथे सकल मराठा समाज आक्रमक

मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत आहे

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर : केंद्रीय राज्य मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर बेताल वक्तव्य केल्यामुळे शहरातील सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेऊन नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास बुधवारी (ता.१४) सायंकाळी पाचच्या सुमारास जोडे मारो आंदोलन करुन पुतळ्याचे दहन केले.

मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत आहे यामुळे मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. मात्र एकीकडे मनोज जरांगे पाटील आपला जीव धोक्यात घालत आहेत तर दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बाबत ट्विटरवर बेताल वक्तव्य केल्याचा आक्षेप घेतला.

यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केले. त्यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातील युवकांनी एकत्र येत नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून पुतळा जाळून निषेध नोंदवला आहे या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभा

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा विसर्जनाच्या प्रतीक्षेत, चिंतामणीला दिला निरोप

SCROLL FOR NEXT