maratha kranti morcha
maratha kranti morcha 
मराठवाडा

#MarathaKrantiMorcha क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक 

अतुल पाटील

औरंगाबाद, ता. 8 : मराठा आरक्षणसाठी गुरुवारी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. अहिंसक, असहकार पद्धतीने ते आंदोलन करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. औरंगाबादेत झालेल्या समन्वयकांच्या राज्यव्यापी बैठकीत बुधवारी (ता. 8) हा निर्णय घेण्यात आला. बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या असून बंद न करण्याचा निर्णय घेतलेल्या जिल्ह्यांना यातून मुभा दिली आहे. 

राज्यव्यापी बैठकीनंतर समन्वयकांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. समन्वयक म्हणाले, ""मराठा आरक्षणासाठी एकेक जीव जात आहे. तरुणांचा सरकारवर विश्‍वास राहिला नाही. मात्र, न्यायालयावर आणि आपल्या आंदोलनावर विश्‍वास ठेवला पाहिजे. समाजबांधवांनी आत्महत्या करु नयेत, तसेच कोपर्डी प्रकरण स्मरणात ठेऊन क्रांती दिनाचे आंदोलन शांततेत करावे, हिंसेला थारा देऊ नये.'' 

सरकारनेही शब्दछळ करु नये, आत्मबलीदान करणाऱ्यांना 50 लाखाची मदत आणि कुटूंबियांना नोकरीत घ्यावे. आंदोलनातून समाज बांधवावर गंभीर गुन्हे दाखल होत आहेत. मराठा समाजाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सरकार आणि समाजकंटकाकडून होतोय. त्यासाठी स्वत:लाच शिक्षा म्हणून 15 ऑगस्टपासून चुलबंद आंदोलन करण्यात येणार आहे. एकवेळचा अन्नत्याग करण्यात येईल. 

राज्यव्यापी बैठक तब्बल तीन तास चालली. राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, तर नऊ जिल्हा समन्वयकांनी संदेशाद्वारे आपण जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असल्याचे कळविले होते. आंदोलनाबाबत प्रत्येकानी आपापली भूमिका मांडली. त्यानंतर महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आला. 

- सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत होणार महाराष्ट्र बंद 
- आंदोलनादरम्यानचे गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत 
- गुन्हे मागे न घेतल्यास 15 ऑगस्टपासून चुलबंद आंदोलन 
- तालुका, जिल्हा स्तरावर 10 ऑगस्टपासून साखळी उपोषण 
- आत्महत्या रोखण्यासाठी 10 ते 12 संवाद यात्रा निघणार 

हज यात्रेकरुंनाही वाट देणार 
महाराष्ट्र बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. दवाखाने, मेडिकल सुरु राहतील. एसटी महामंडळाच्या वाहनाला टार्गेट करु नका, असे आवाहन समन्वयकांनी केले. आतापर्यंत रुग्णवाहिकांना जशी वाट करुन दिली. तसेच धार्मिक यात्रा म्हणजेच हज यात्रेकरुंनाही आंदोलक वाट करुन देतील. अशी आचारसंहिता महाराष्ट्र बंदसाठी तयार केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT