kishor balande
kishor balande sakal
मराठवाडा

Maratha Reservation : आरक्षणासाठी निकटवर्तीयाने राजीनामा दिल्याने मंत्री अब्दुल सत्तार यांना धक्का

नवनाथ इधाटे

फुलंब्री - मराठा आरक्षणाचे वातावरण आता चांगलेच भेटले असून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आता राजीनामे देणे सुरू केले आहे. माजी अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी बाजार समितीच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे अल्पसंख्यांक मंत्री सत्तार यांना धक्का बसला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला हा घरचाच आहेर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र सुरू आहे.

फुलंब्री तालुक्यात मागील गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने सरकारवर नाराजी व्यक्त करून राजीनाम्याचे सत्र सुरू केले आहे. दरम्यान फुलंब्री तालुक्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषणही सुरू झालेले आहे.

या साखळी उपोषणात सहभाग घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील व मराठा समाज यांना सरकारने 30 दिवसाची मुदत मागितली होती. मात्र समाजाने सरकारला चाळीस दिवस दिले.

चाळीस दिवस उलटूनही मराठा समाज बांधवांना दिलेल्या शब्द सरकारने न पाळल्यामुळे या सरकारचा निषेध व्यक्त करून कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्रीच्या संचालक पदाचा किशोर बलांडे यांनी राजीनामा दिल्यामुळे अल्पसंख्यांक मंत्री सत्तार जोरदार यांना धक्का बसला आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून बलांडे यांना अब्दुल सत्तार यांनी बळ दिले आहे. त्यामुळे आता वर्षभर विधानसभेची निवडणूक राहिल्याने बलांडे यांनी राजीनामा दिल्यामुळे मंत्री सत्तार यांना चांगला धक्का बसला आहे. त्यामुळे दिवसभर राजकीय वर्तुळात बलांडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे.

सत्ताधारी पक्षाचे राजीनामाचे सत्र सुरू

मराठा आरक्षणासाठी सर्व मराठा समाज हळूहळू एकवटत असून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारीही आता मराठा आरक्षणासाठी राजीनामे देऊ लागले आहे. शिवसेना शिंदे गटाचे तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे खंदे समर्थक किशोर बलांडे यांनी समाजाच्या भावना लक्षात घेऊन राजीनामा दिला.

तसेच भाजपचे रोषण अवसरमल यांनीही बाजार समितीच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिवसेना शिंदे गटाचे युवासेना तालुका प्रमुख भारत भूमे यांनीही राजीनामा दिला आहे. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारीही राजीनामा देत असल्याने सरकार पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT