Maratha Reservation Mobile Tower
Maratha Reservation Mobile Tower sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोबाईल टॉवरवर चढून आगळे वेगळे आंदोलन

बाबासाहेब गोंटे

अंबड, जि. जालना - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील सकल मराठा समाज बांधव मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहे. सरकार मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून कुणबी प्रमाणपत्र देण्यास सतत सरकार टाळाटाळ करत असल्याने मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज बांधवांनी टोकाचे पाऊल उचलले होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील रोहिलागड गावातील जिओ कंपनी च्या टॉवरवर चढून शनिवारी (ता. 28) सकाळी नऊ वाजल्यापासून मोबाईल टॉवरवर चढून श्री. नारायण टकले, बाळासाहेब पाटील, बळीराम वैद्य, ज्ञानेश्वर पाटील, सुदर्शन थोरे, कैलास पाटील, लखन पाटील, नितीन टकले, किशोर टकले, नारायण गोंटे, गणेश टकले, शंभु टकले, हनुमान तार्डे यांच्यासह आदी सकल मराठा समाज बांधवांनी आगळे वेगळे आंदोलन सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आले होते.

दुपारी तीन वाजेपर्यंत मराठा आरक्षण देत कसे नाही. घेतल्या शिवाय राहत नाही. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत संपूर्ण गाव अक्षरशः दणाणून सोडले होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलन कर्त्याची समजूत काढत तुमच्या भावना तात्काळ प्रशासनाच्या वतीने सरकारला कळविण्याचे आश्वासन दिल्याने त्यानंतर मोबाईल टॉवरवरून खाली उतरून आंदोलन थांबविण्यात आले.

मात्र आंदोलनकर्ते यांनी सरकार विरोध तीव्र संताप व्यक्त करत सरकारचा निषेध करत भविष्यात मराठा आरक्षणासाठी पुन्हा वेगळ्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलकर्ते नारायण टकले, बाळासाहेब पाटील, बळीराम वैद्यसह आदी यांच्यासह आदींनी इशारा दिला.

आंदोलन कर्त्याच्या वतीने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना मागण्याचे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी बीट अंमलदार श्री देशमुख, तलाठी श्री रामेश्वर जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT