maratha reservation youth write on his leg and hand end his life jintur 3rd sacrifice sakal
मराठवाडा

Maratha Reservation : हातापायावर लिहून ठेवत तरुणाने जीवन संपवले; जिंतूर तालुक्यात मराठा आरक्षणाचा तिसरा बळी

मराठा आरक्षण डिसेंबर २४' असे हातापायावर , नोंदवून विषारी औषध प्राशन करून स्वत:ची जीवनयात्रा संपवली.

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर : तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन हद्दीत रेपा येथील मराठी समाजातील एका सुशिक्षित तरूणाने 'एक असली पाटील,मराठा आरक्षण डिसेंबर २४' असे हातापायावर , नोंदवून विषारी औषध प्राशन करून स्वत:ची जीवनयात्रा संपवली.

सदरची घटना शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दत्तात्रेय शिवाजी पवार (वय ३२) असे आत्महत्याग्रस्ताचे नाव आहे.या घटनेमुळे पवार हा मराठा आरक्षणाच्या मुद्यावरचा तालुक्यातील तालुक्यातील तिसरा बळी ठरला.

मराठा आरक्षणसंदर्भात सरकारच्या वेळकाढूपणाच्या धोरणाला कंटाळून व मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या विषारी भाषेमुळे उद्विग्न होऊन दत्ता पवार यांनी मरणाला कवटाळले असल्याचे सांगण्यात येत आहे.

पवार हे अत्यल्प भूधारक असून ते छत्रपती संभाजीनगर येथे एका खाजगी कंपनीमध्ये कामावर होते.काही दिवस गावाकडे आले होते.त्यातच सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्याबाबतीत २४ डिसेंबर ही डेडलाईन संपत आली

असतानादेखील सरकारमधील आणि विरोधी पक्षातील काही आमदार अद्यापही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी स्पष्ट भूमिका घेताना दिसत नसल्याने साशंक होत आरक्षण नसल्यामुळे उच्च शिक्षण घेऊनदेखील आपल्यावर कंपनीमध्ये काम करण्याची वेळ आली असून आपल्या नशिबी अठरा विश्व दारिद्र्य आलं.

आपल्या मुलाबाळांवरही अशीच वेळ येईल की काय या विवंचनेतून दत्ता पवार यांनी गाव परिसरातील शेतात विषारी औषध घेऊन अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले असता गावकऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी त्यांच्या पायावर (एक असली पाटिल मराठा आरक्षण २४ डिसेंबर ) तर दोन्ही हातावर मिशन मराठा २०२४ आरक्षण २०२३ काय करता ५० मराठा असा मजकूर दिसला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व मराठा आरक्षण समन्वयक समितीचे बालाजी शिंदे सोसकर,

माजी सैनिक बालाजी शिंदे,बाळासाहेब काजळे,अँड माधव दाभाडे, प्रभाकर लिखे,आदींनी रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.यावेळी पोलीस निरीक्षक दीपक तिडके,बोरी पोलीस ठाण्याच्या श्रीमती सरला गाडेकर, गोपनीय शाखेचे पोलिस हवालदार जिया खान पठाण यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होत प्राथमिक पंचनामा केला. पवार यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,आई वडील असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopal Badne : मोठी बातमी ! फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिस ठाण्यात हजर, म्हणाला- मी प्रामाणिक...

भारताची नवी ‘फुलराणी’

Sunday Morning Breakfast Recipe: रविवारी सकाळच्या नाश्त्यात बनवा 'बटाटा मसाला पुरी', लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे राशिभविष्य - 26 ऑक्टोबर 2025

स्वागत नव्या पुस्तकांचे

SCROLL FOR NEXT