Babanrao-Lonikar
Babanrao-Lonikar 
मराठवाडा

भूजल खाते जाता जाता वाचले - बबनराव लोणीकर

सकाळवृत्तसेवा
औरंगाबाद - 'भूजल खाते माझ्याकडून जाता जाता वाचले आहे. जलसंवर्धन खात्याकडे हा विभाग असावा, अशी मागणी जलसंधारण राज्यमंत्री राम शिंदे यांनी केली होती; मात्र मी जोर लावल्याने तो प्रयत्न सफल होऊ शकले नाही,'' अशी स्पष्टोक्ती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

भूजल अभियंता संघटनेचे 21 वे वार्षिक अधिवेशन जेएनईसी कॉलेजच्या सभागृहात रविवारी पार पडले. या वेळी ते बोलत होते. या वेळी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, राहुल श्रीरामे, अध्यक्ष बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. महसूल, जलसंधारण, कृषी व ग्रामविकास विभागाच्या चाव्या भूजल विभागाकडे आहेत. त्यामुळे अभियंत्यांनी या खात्याचे महत्त्व, अधिकार समजून घ्यावे. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत भूजल विभागाचे अधिकारी वाढविले आहेत, असेही लोणीकर यांनी सांगितले. भूजल खात्यातील अभियंत्यांना पूर्वीपासून असलेले खोदन अभियंता हे नाव का दिले, हे तीन वर्षांत कळले नाही. त्यामुळे हे नाव बदलण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक बोलवू, असे आश्वासन लोणीकर यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT