‘अस्वच्छ’ सर्वेक्षण... औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने जोरदार तयारी केली होती. मात्र, पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ‘कचराकोंडी’ने या तयारीवर पाणी फेरले आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंगच्या श
‘अस्वच्छ’ सर्वेक्षण... औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने जोरदार तयारी केली होती. मात्र, पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ‘कचराकोंडी’ने या तयारीवर पाणी फेरले आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंगच्या श 
मराठवाडा

शहराला रोगराईचा धोका

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपोच्या विरोधात मंगळवारी (ता. २०) सलग पाचव्या दिवशीही नागरिकांचे आंदोलन सुरूच असून, कचऱ्याच्या कोंडीवर काहीच पर्याय समोर येत नसल्याने प्रशासन, पदाधिकारी हतबल झाले आहेत. हजारो टन कचरा शहराच्या विविध भागांत पाच दिवसांपासून पडून असल्याने परिसरातील नागरिकांना रोगराईचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयामधील डॉक्‍टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून, दोन लाख मास्क खरेदी करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहेत.

साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी औषधी मागविण्यात आली आहे. 
नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपोच्या विरोधात नागरिकांनी शुक्रवारपासून (ता. १६) आंदोलन सुरू केले आहे. पाचव्या दिवशीदेखील कचराकोंडीवर तोडगा निघाला नाही. शहर परिसरात सर्वच ठिकाणी कचरा टाकण्यास प्रचंड विरोध होत असल्याने आता करावे तरी काय? अशा प्रश्‍न पदाधिकारी, प्रशासनाला पडला आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शहराचे स्वच्छतादूत असलेले व घनकचरा व्यवस्थापनात अभ्यास असणारे उद्योजक राम भोगले यांना पाचारण करण्यात आले. सेंट्रल नाका येथे पाच दिवसांपासून कचऱ्याने भरलेल्या तीस ट्रक उभ्या असून, त्यातून उग्र वास येत असल्याने कचऱ्यावर बायोट्रीट औषधी फवारण्याच्या सूचना श्री. भोगले यांनी केल्या. या औषधीमुळे कचऱ्याचील विषाणू मरतात व त्यातून निघणारी दुर्गंधी बंद होणार आहे. त्यानुसार सुमारे पाच टन औषधी मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. ६५० रुपये प्रतिकिलो अशी औषधाची किंमत असून, श्री. भोगले यांच्या मध्यस्थीमुळे २५ टक्के सूट देण्यात येणार असल्याचे श्री. घोडेले यांनी सांगितले. औषधी उपलब्ध होईपर्यंत सध्या शहरात पडून असलेल्या सुमारे दीड ते दोन हजार टन कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांच्या सुट्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत; तसेच बाह्यरुग्ण विभाग दुपारी चार ते आठ सुरू ठेवण्यात येणार आहे. खासगी डॉक्‍टरांनादेखील महापालिकेला सेवा देण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 महापालिका डॉक्‍टरांच्या सुट्या केल्या रद्द 
 दोन लाख मास्क खरेदी करण्याचे आदेश 
 कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी औषधी मागविली
 कचराकोंडी कायम; प्रशासन, पदाधिकारी हतबल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT