औरंगाबाद - मुंबईत ‘डीएमआयसी’च्या पहिल्या अँकर प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
औरंगाबाद - मुंबईत ‘डीएमआयसी’च्या पहिल्या अँकर प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 
मराठवाडा

‘ह्योसंग’ला शंभर एकर भूखंडाचे हस्तांतरण

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - ‘डीएमआयसी’तील सर्वांत पहिली आणि मोठी गुंतवणूक ठरलेल्या ‘ह्योसंग’ कंपनीला शेंद्रा येथील ऑरिक सिटीत १०० एकर भूखंडाचे हस्तांतरण सोमवारी (ता. १९) करण्यात आले. लगोलग या समूहाच्या उपाध्यक्षांनी आपल्या चमूसह शेंद्रा येथील भूखंडाची पाहणी केली. 

शेंद्रा येथील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत अँकर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण कोरियन ह्योसंग कॉर्पोरेशन या कंपनीने घेतला आहे. १०० एकरच्या जागेसाठीची आरक्षण रक्कम भरून भूखंड पटकाविणाऱ्या या कंपनीला ‘एआयटीएल’तर्फे हस्तांतरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी बारा वाजता विक्रम कुमार यांनी यासाठीची औपचारिकता पूर्ण केली. या वेळी सह-सरव्यवस्थापक गजानन पाटील, ‘ह्योसंग’चे ग्लोबल चेअरमन चो ह्युन जून यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी या शंभर एकर भूखंडाच्या वितरणासाठी लॅंड ॲलॉटमेंट कमिटीची बैठक शुक्रवारी (ता. १६) घेण्यात आली. या बैठकीत त्यांना भूमी हस्तांतरण पत्र प्रदान करण्यात आले. 

औरंगाबादेत सादरीकरण, जागेची पाहणी
सोमवारी ‘ह्योसंग’च्या कोअर ग्रुपच्या सदस्यांचा एक चमू शेंद्रा येथील ऑरिक सिटीमध्ये असलेल्या आपल्या १०० एकरच्या भूखंडाची पाहणी करून गेला. प्लॉटची जागा आणि सुविधा या वेळी त्यांनी नजरेखालून घालत आगामी काळात होणाऱ्या बदलांबाबत चर्चा केली. ऑरिकच्या साईट ऑफिसमध्ये या चमूला येथील प्रकल्पात ‘सीएचटूएम’तर्फे सुरू असलेल्या पायभूत सुविधेची माहिती सादरीकरणातून देण्यात आली. या वेळी प्रसाद जस्ती, सॅंग उन ली, जेई जुंग, जॅंग जायो लिम, रोहित कौशल, शैलेंद्र धाबेकर, महेश शिंदे पाटील आदींची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT