Marathi news Beed news councilor charged fraud
Marathi news Beed news councilor charged fraud 
मराठवाडा

नव्या नगराध्यक्षावर चार दिवसांत अपहाराचा गुन्हा

रामदास साबळे

केज : नगरपंचायतअंतर्गत प्रभाग क्रमांक बारामधील रस्ता व नालीचे बांधकाम न करताच सात लाख छत्तीस हजार सातशे शहाएैंशी रूपयांचा विकास निधी हडप केल्याच्या आरोपावरुन नगराध्यक्ष आदित्य पाटील यांच्यासह सहा जणांवर केज पोलिस ठण्यात सोमवारी (ता. २०) उशिरा गुन्हा नोंद झाला. विशेष म्हणजे, त्यांची गेल्या शुक्रवारीच (ता. १७) नगराध्यक्षपदी निवड झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मालती गुंड यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला गुन्हा नोंद न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. अंबाजोगाई न्यायालयाने या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश एक महिन्यांपूर्वी दिले होते.

चौकशीअंती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नगराध्यक्ष आदित्य पाटील (तत्कालिन उपनगराध्यक्ष), मुख्याधिकारी पुष्पगंधा बालासाहेब भगत, कंत्राटदार विलास ज्ञानोबा थोरात, तत्कालीन नगराध्यक्ष कबीरोद्दीन नसिरोद्दीन इनामदार, तत्कालीन उपनगराध्यक्ष आदित्य अशोक पाटील, नगरसेवक पशुपतीनाथ दांगट, अभियंता सुभाष रोकडे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

Fact Check : चीनमधला पूल मुंबईचा सांगून '४०० पार' चा दावा; फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

SCROLL FOR NEXT