File photo
File photo 
मराठवाडा

विकास, भ्रष्टाचार हे भाजपसाठी समानार्थी शब्द : कन्हैय्या कुमार 

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (जि. बीड) : 'भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही' या भाजपच्या घोषणेचा अर्थ म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांना इतर पक्षांमध्ये ठेवणार नसून त्यांना भाजपमध्ये घेणार आहोत, असा आहे' अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने आज (सोमवार) केली. 'विकास आणि भ्रष्टाचार हे भाजपसाठी समानार्थी शब्द आहेत' असेही तो म्हणाला. 

दिवंगत खासदार गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंबाजोगाईमध्ये कन्हैय्या कुमारचे भाषण झाले. यामध्ये कन्हैय्या म्हणाला, "नारायण राणे 'एनडीए'मध्ये दाखल झाल्यानंतर वरील वाक्‍य नेहमीच आठवू लागले आहेत. काँग्रेस भ्रष्ट होती, म्हणून अण्णा हजारे यांनी आंदोलन केले; पण अण्णांनी ज्या घोड्यावर डाव लावला, तो घोडाच भ्रष्टाचारी निघाला. 'पतंजलि'च्या वस्तू घेतल्याने देशसेवा होत नाही, तर 'पतंजलि'चीच सेवा होते. भाजपला काँग्रेसमुक्त भारत हवा आहे, की नेहरू, आंबेडकर, पटेलमुक्त भारत पाहिजे आहे, असा प्रश्‍न आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दाढी कोरण्यासाठी खास डिझायनर असून त्यासाठी हजारोंचा खर्च होतो. शेतकरी आत्महत्येबाबत चर्चा करण्याऐवजी ते गोहत्याबंदी, सरदार पटेल यांचा पुतळा, गंगेची सफाई अशा मुद्यांवर चर्चा करतात.'' 

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत म्हणतात, तर विजय मल्ल्या यांची नऊ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी कशी झाली' असा प्रश्‍नही कन्हैय्याने उपस्थित केला. 'भाजप म्हणजे गरीबांना मारून खाणारी पार्टी आहे. भ्रष्टाचार रोखणार म्हणताना सुखराम, नारायण राणे, मुकूल रॉय यांना पक्षात घेता.. एकीकडे भाजपचे नेते अखंड भारताची भाषा बोलत असतात आणि दुसरीकडे वेगळा खलिस्तान मागणाऱ्या अकाली दलासोबत आणि स्वतंत्र काश्‍मीर मागणाऱ्या पीडीपीबरोबर सत्तेत बसतात, असे भाजपचे दुटप्पी धोरण आहे', अशी टीकाही त्याने केली. 

मी चुकीचा असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.. मग मजबूत पंतप्रधान आणि एकहाती सत्ता असतानाही ते रोखत नाहीत? कारण ते माझ्या प्रश्‍नांना घाबरतात.. माणसांना आता त्यांची जात, धर्म यावरून ओळखण्याची पद्धत सुरू झाली आहे. खरे बोलणाऱ्यांना देशविरोधी ठरविण्याचे प्रयत्न होत आहेत. राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार, समान विचार दिले; पण असे वागणाऱ्यांना आता देशद्रोही म्हटले जाते. 
- कन्हैय्या कुमार, विद्यार्थी नेता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT