Javaya'neck procession taken out donkey
Javaya'neck procession taken out donkey Sakal
मराठवाडा

मराठवाडा : जावयाचा मान, गाढवावरुन काढली जाते मिरवणूक

दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा

बीड : जावयाचा मानपान ठेवताना सासुरवाडीकरांची कायम तारांबळ उडते. लग्नात तर सगळा थाटमाट ठेवूनही मिरवणूकीला घोडा नसेल तर नवरदेव आणि त्याच्या मित्रमंडळीचा पारा इतका चढतो कि त्याला शांत करताना अख्ख्या सासुरवाडीच्या गावच्या मंडळींची त्याचे पाय धरावे लागतात. पण, जावयाचा असा थाट माहित असणाऱ्यांना जावयाची गदर्भ सवारी देखील निघते हे ऐकून आणि वाचून धक्काच बसेल. पण हे खरे आहे कि जावयाला पकडून त्याला चपलांचा हार घातलेल्या गाढवावरुन जावयाची गावभर मिरवणूक काढून नंतर मनपसंत कपड्यांचा आहेरही केला जातो.

Javaya'neck procession taken out donkey

विडा (ता. केज) येथील परंपरेला अखंडीत शंभर वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे. अपवाद मागच्या वर्षी कोविडच्या लॉकडाऊनचा आहे. एकिकडे जावयाची गदर्भसवारी असे चित्र असले तरी दुसरीकडे या परंपरेतून सामाजिक एकोपा व सलोख्याचाही अध्याय जपला आहे हे विशेष.

दरम्यान, यंदा गर्दभ सवारीचे मानकरी अमृतराजे देशमुख ठरणार आहेत. धुलीवंदनाच्या आदल्या दिवशी गुरुवारी (ता. १७) मेहुण्यांच्या पथकाने त्यांना जाळ्यात ओढले. रातंजन (ता. वैराग, जि. सोलापूर) येथील अमृतराजे श्रीमंतराव देशमुख यांचे जावई आहेत. गुरुवारी त्यांना सरपंच सुरज पटाईत, तुकाराम पटाईत, चिंतानम काळे, डॉ. उदय पवार, दिपक वाघमारे, अजय पटाईत, अशफाक शेख आदींनी पकडले.

Javaya'neck procession taken out donkey

विडा हे निझाम कालीन राजवटीतील जहागिरदारीचे गाव. तत्कालिन जहागिरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे वारसदार ठाकूर समिरसिंह देशमुख सांगतात, साधारण १९१५ साली दिवंगत आनंदराव देशमुख यांचे बाळनाथ चिंचोली येथील मेहूणे ऐन धुलीवंधनाच्या दिवशी विड्यात आले. जहागिरदारांचे मेहूणे आणि ऐन धुलीवंदनाच्या दिवशी म्हणजे त्यांचा खास थाटमाट सुरुच होता. याच निमित्त गावातील प्रमुख मंडळीही धुलीवंदनाचा पाहुणचार घेण्यासाठी जमलेली होती. धुलीवंदनाचा दिवस म्हणजे खाण्याबरोबर त्या काळी भांग देखील पिले जायचे. भांग पिऊन थट्टा मस्करी सुरु झाली आणि मग मस्करीत या जावईबापूंची गावकऱ्यांनी गाढवावर बसून सवारी काढली. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, तेव्हापासून सुरु झालेली परंपरा अखंडीतपणे (कोविड लॉकडाऊनसारखे अपवाद वगळता) सुरु आहे हे विशेष. विशेष म्हणजे एकदा मिरवणूक काढलेल्यांची पुन्हा मिरवणूक निघत नाही.

थोडीशी ओढाताण अन॒ गळून जातो मान - पान

जावई म्हणजे सासुरवाडीकरांचा ‘वीक’ पॉईंट. सासुरवाडीत या पठ्ठ्यांचा मान आणि त्यांची सरबराई काही औरच. येरव्ही त्यांना या सगळ्या गोष्टी भेटतातही. पण, धुलीवंदनाच्या दिवशी एकदा मेहुण्यांच्या सपाट्यात सापडल्यानंतर जावई थोडीशी ओढाताण करतात. नंतर मात्र हसत हसत गुमान गाढवावर बसतात. नाईलाजही असतो आणि सासुरवाडीची परंपराही त्यांना जपायची असते. मग, मिरवणूक होईपर्यंत हालचाल चालत नाही. चपलांचा हार घातलेल्या गाढवावर बसून गावभर मिरवून घेतात.

Javaya'neck procession taken out donkey

जावयांनाही सासुरवाडीचा लईच लळा

प्रत्येक गावांची वेगळी ओळख असते. तसे जहागिरदारीचे गाव असा इतिहास आहे. गावात साधू शिवरामपूरी महाराजांची संजीवन समाधी आहे. तसेच तेलाचा व दक्षिणमुखी हनुमान महाराजांचे भव्य मंदीर गावच्या वेशीजवळच आहे. अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमे होणाऱ्या गावात लळीत नाट्याची परंपराही शंभर वर्षांपासून जपली जाते. लळीत नाट्य राज्यात मोजक्याच तीन - चार ठिकाणी होते हे विशेष. लोकशाहीच्या राजकारणात गावाला जिल्हा परिषद अध्यक्षपद, सदस्यसदप, पंचायत समिती सदस्यपद मिळालेले आहेत.

आता यात जावईवेडे गाव असे नवे विशेषण गावाला जाडले गेले आहे. कारण, सात हजारांवर लोकसंख्येच्या गावात कायम दोनशेंवर जावयांचा गावात कायम राबता असतो. अगदी सासुरवाडीत राहूनही ही मंडळी गावगाड्यात पुढे असतात. गावातल्याच मुलींशी लग्न केलेले गावजावई, घरजावई तसेच नोकरी व व्यवसायानिमित्त स्थिरावलेले जावई यांची संख्या दोनशेंच्या पुढे पोचली आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या दिवशी सासुरवाडीत आले आणि पुन्हा स्वत:च्या गावातच गेले नाहीत अशीही काही उदाहरणे आहेत हे विशेष.

सासरे, जावई अन॒ जावयांचेही जावई....

गावातीलच सोईरपण केलेल्यांची संख्याही विडा येथे मोठी आहे. त्यामुळे धुलीवंदनाच्या दिवशी जावई मिरवणूकीत त्यांचाही मान असतो. या जावई गदर्भ सवारीच्या मानाच्या परंपरेत गावातीलच सासरे, त्यांचेही गावातीलच जावई आणि पुन्हा त्यांचेही जावई अशा चौघांना हा मान मिळालेला आहे. दिवंगत देवराव मस्कर यांचीही विडा या गावातीलच सासुरवाडी होती. देवराव मस्कर यांच्या मुली गावातीच चंद्रसेन पवार व महादेव पवार यांना दिलेल्या आहेत. दिवंगत देवराव मस्कर यांची ६० वर्षांपूर्वी मिरवणूक निघाली होती. तर, चंद्रसेन पवार यांची २५ आणि महादेव पवार यांची २० वर्षांपूर्वी मिरवणूक निघाली होती. महादेव पवार यांची मुलगीही गावातीच शिक्षक अंगद देठे यांना दिलेली आहे. महादेवरावांचे जावई अंगदराव यांचीही १४ वर्षांपूर्वी अशी मिरवणूक निघाली. अशा पद्धतीने सासरे, त्यांचे जावई व जावयांचे जावई यांच्या मिरवणूकाही निघाल्या. तर, गावातील एकनाथ पवार देखील येथीलच मोहन घोरपडे यांचे जावई आहेत. एकनथरावांची मुलगी गावातीलच महादेव घोरपडे यांना दिलेली आहे. या दोन्ही सासरे - जावयांच्याही मिरवणूका निघाल्या.

सामाजिक एकोपा व सलोख्याचे दर्शन

दरम्यान, जावयाची गदर्भसवारी म्हणजे अपमानाचा सर्वोच्च बिंदू असे चित्र उभे राहते. मात्र, या घटनेकडे परंपरा म्हणून पाहिले जाते. विशेष म्हणजे अशा मिरवणुकीत अद्याप कधीही भांडण - तंटा, मान - अपमान असा प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे आतापर्यंच्या या परंपरेत गावातील सगळ्याच जाती - धर्मांच्या जावयांना मिरवले आहे. अगदी मुस्लिम धर्मातील गावातीलच जावई असलेले शिक्षक सादेक कुरेशी यांनाही या मिरवणूकीचा मान मिळालेला आहे. या मिरणूकीसाठी तरुणांपासून अबालवृद्ध एकत्र होतात. मिरवणूक व जावयाला आहेरसाठी घेतलेल्या कपड्यांच्या खर्चासाठी सर्वजण वर्गणी करतात.

खास्ता खाऊनही मेहुणे मानत नाहीत हार

गावात दोनशेंवर जावयांची संख्या असली तरी धुलीवंदन जवळ येतातच जावई मंडळी धुम ठोकते. पाहुणे कींवा स्वत:च्या गावांना जाऊन बसतात. मात्र, ही परंपरा कायम ठेवण्यासाठी गावातील तरुण एकत्र येऊन जावई शोध समिती केली जाते, असे सरपंच सुरज पटाईत सांगतात. समितीतील सदस्यांची वेगवेगळी पथके करुन जावयांच्या शोधात धुलीवंदनाच्या दोन दिवस अगोदरपासूनच निघतात. कोण्याही हालतीत एका जावयाला हाती घेऊन मग गावात पोचून त्याला निगराणीखाली ठेवले जाते. मग, सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मिरवणूकीला सुरुवात होते.

गाढवाला चपलांचा हार, रंगाची उधळण अन॒ कपड्यांचा आहेर

दरम्यान, गावातील मुख्य रस्त्यावरुन मिरवणूकीला सुरुवात होते. जावई बसलेल्या गाढवाला चपलेचा हार घातला जातो. समोर हातगाड्यांवर किंवा वाहनात रंगाचे बॅरल असतात. त्यातून रंगाची उधळण होते. समोरच ढोली बाजा, डिझेचा दणदणाट असतो. त्यावर तरुण थिरकतात. रस्त्याच्या दुतर्फा घरांवर थांबलेल्या महिलांकडूनही मिरवणूकीवर रंगाची उधळण होत असते. गावातील प्रमुख रस्त्यांवरुन दुपार पर्यंत मिरवणूक गावचे ग्रामदैवत राजा हनुमान मंदीरासमोर पोचते. या ठिकाणी लोकवर्गणीतून जमलेल्या पैशांतून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर गावातील प्रतिष्ठीतांच्या हस्ते जावयाला दिला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT