The market committee will start the fodder camp today from Karmad Aurangabad
The market committee will start the fodder camp today from Karmad Aurangabad 
मराठवाडा

बाजार समितीतर्फे करमाडला आजपासून सुरू होणार चारा छावणी   

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : दुष्काळामूळे जनावारांचा चारा आणि पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाले आहे. यावर मात करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. यात आता बाजार समितीतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. बाजार समितीतर्फे करमाड येथील उपबाजारपेठे येथे चारा छावणी सुरु करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. 15) या छावणीचे उद्‌घाटन होणार आहे. अशी माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी मंगळवारी (ता. 14) दिली. 

करमाड येथे सकाळी 11 वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते चारा छावणीचे उद्‌घाटन होईल. यावेळी तहसिलदार श्री. सोनी, एसडीएम ज्ञानोबा बारापूरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या छावणीत एक हजार जनावारांचा सुविधा करण्यात येणार आहे. शासनाच्या नॉम्स नुसार आम्ही चारा छावणीत सर्व सुविधा देणार आहे. पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासह जडगाव हिवरा जवळ पाण्याची व्यवस्था होईल का यांचीही चाचपणी करण्यात येत आहे. तर चारा इंचलकरंजी येथून कुट्टी करून मागविण्यात आला आहे. जनावारांना रोज सोयाबीन, तुर, हरभरा यांचा भुसा खायला देणार आहे. सध्या बाजार समितीतर्फे चारा छावणी उभारणीसाठी बाबू नेट लावण्यात येत आहे. जनवाराबरोबर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या जेवणाची विषयी संचालक मंडळात चर्चा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. 

छावणीत सहभागी होण्याचे आवाहन -
चारा छावणीत औरंगाबाद तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपले जनावारे आणावेत. जनावरे आणाताना सोबत शेतकऱ्यांनी सातबारा आणावा असे आवाहन सभापती राधाकिसन पठाडे यांनी केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT