मराठवाडा

मटण, माशांच्या दरात ऐंशी रुपयांची वाढ

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - वाढत्या थंडीमुळे मटण, माशांच्या दरात ऐंशी रुपयांनी वाढ झाली आहे. थंडीमुळे उत्पादन कमी झाल्याने कोंबड्यांना सर्वाधिक मागणी आहे. मांसाहारात उष्णता जास्त असल्याने थंडीच्या दिवसात मांसाहाराला आवर्जून मागणी होते. काही महिन्यांची तुलना केली तर चिकन पन्नास ते साठ तर माशांचे ७० ते ८० रुपयांनी दर वाढले आहेत. 

दीड ते दोन महिन्यांपूर्वी कोंबड्यांचे उत्पादन जास्त झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर माल उपलब्ध होता. त्यामुळे चिकनच्या दरात बरीच घसरण झाली होती. त्यावेळी ८० ते १०० रुपये किलो दराने चिकनची विक्री होती. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे कोंबड्यांच्या उत्पादनात खूप घट झाली आहे. थंडीमुळे चिकन व जिवंत कोंबड्यांना विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढली आहे. जिवंत कोंबडी आणि चिकन दोन्हींचे दर वधारले आहेत. सध्या चिकन दोनशे ते २२० रुपये किलो तर जिवंत कोंबडी १२० ते १५० रुपये किलोने विक्री होत आहे. जिवंत गावरान कोंबडी दोनशे ते ३७० रुपयांत तर चारशे ते पाचशे रुपये किलो गावरान चिकनची विक्री होत आहे. मटण पाचशे रुपये किलो दराने विक्री होत आहे, थंडीमुळे विविध माशांचे दरही बऱ्याच अंशी वाढले आहेत.

मराठवाड्यात पाणी टंचाई जाणवत असल्याने कोंबड्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कोंबड्यांची कमतरता भासत असल्याने मागणी वाढली आहे, तर थंडीमुळे मागणी जास्त असल्याने माशांच्या दरात वाढ झाली आहे.
- शौकत पठाण, मांस विक्रते

माशांचे प्रकार व दर 
(किलोमागे)
  वाम - ६०० रुपये
  पापलेट - ६०० रुपये
  सुरमई - पाचशे रुपये
  ओले बोंबील - १०० रुपये 
  बांगडा - २०० रुपये 
  शिंगाडा २४० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT