Aurangabad
Aurangabad 
मराठवाडा

एमआयएम नगरसेवक मतीन यांना पुन्हा प्रवेश नाकारला

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना पुन्हा एकदा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रवेश नाकारण्यात आला. भाजपा नगरसेवकांनी त्यांना प्रवेश देण्यास कडाडून विरोध केला तर त्यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात यावी या मागणीसाठी एमआयएम नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर महापौरांनी सुमारे पंधरा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले.

शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठा व मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसंदर्भात महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे गुरुवारी (ता.एक) आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बद्दल गैरउद्गार काढणारे एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना सर्वसाधारण सभेत प्रवेश देण्यात येऊ नये अशी मागणी केली. त्यावर एमआयएम, काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मतीन यांना सभागृहात मारहाण झाली होती.

ज्या सदस्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र महापौरांनी मतीन यांना प्रवेश न देण्याचा निर्णय कायम ठेवल्याने एमआयआय नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सुमारे 15 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला.

खुर्च्यांची तोडफोड
सदस्यत्व रद्द केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या नगरसेवकाने खुर्च्यांची तोडफोड केली. त्यामुळे सभागृहाबाहेर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT