chair
chair 
मराठवाडा

आमदार बच्चू कडूंनी जाळली आयुक्तांची खुर्ची 

माधव इतबारे

औरंगाबाद : वारंवार मागणी करूनही दिव्यांगाच्या योजनांची अंमलबजावणी होत महापालिकेकडून होत नसल्याने संतप्त झालेल्या आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी (ता. 25) प्रहार संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करत आयुक्तांची (प्रतिकात्मक) खुर्ची जाळली. या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

दिव्यांगांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी महापालिकेच्या उत्पन्नातून दरवर्षी तीन टक्के निधी राखून ठेवला पाहिजे, असे शासनाचे आदेश आहेत; मात्र याला महापालिकेतर्फे आदेशाला केराची टोपली दाखविली जाते. सहा महिन्यांपूर्वी प्रहारतर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी श्री. कडू यांना महापौर नंदकुमार घोडेले यांनी आश्वासन दिले होते. मात्र कोणतीच कार्यवाही केलेली नसल्याने मागील महिन्यात "प्रहार'ने बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी स्वतः आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी संघटनेला लेखी आश्वासन दिले. दिव्यांगांना थेट 2 हजार रुपये मासिक मानधन सुरू करण्यात येईल. त्यांना व्यवसायासाठी विविध फुटपाथवर स्टॉल दिले जातील.

महापालिकेच्या व्यावसायिक गाळ्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. विविध विभागांत दिव्यांगांना शासकीय व कंत्राटी सेवेत सामावून घेतले जाईल. तसेच घरकुल योजनेमध्येही प्राधान्य दिले जाईल. त्यानंतरही दिव्यांगांच्या हाती काहीच पडले नाही. त्यामुळे त्यामुळे सोमवारी महापालिकेसमोर प्रहार संघटनेतर्फे गाजर वाटप आंदोलन करण्यात आले. दुपारी दीड वाजत आमदार बच्चू कडू आंदोलनात सहभागी झाले व आक्रमक होत यावेळी खुर्ची जाळण्यात आली. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्या दालनात बैठक झाली व तातडीने दिव्यांगांना धनादेशाचे वाटपही करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT