aurangabad
aurangabad 
मराठवाडा

पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय? ओम फट स्वाहा!

अतुल पाटील

औरंगाबाद : "पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय? ओम फट स्वाहा!' याप्रकारची घोषणा देत सिग्नलवर जाऊन "ताई.. ही घ्या पुडी. नळाला बांधा. चोवीस तास येईल पाणी.' असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने भस्माच्या पुड्या वाटत घोषणाबाजी केली. "नाडीचे ठोके बघून जप करुन भस्माची पुडी देऊन रुग्ण बरे करतो.' या खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वक्‍तव्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 26) क्रांती चौकात आंदोलन झाले. 

औरंगाबाद येथे 23 फेब्रुवारीला झालेल्या महाआरोग्य शिबीरात खासदार खैरे यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, आंदोलन करताना मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी आत्महत्या, रस्त्यावरील खड्डे, बेरोजगारी, रुग्णांवरील उपचाराचे करायचे काय? खैरेबाबाची पुडी एकच उपाय! अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मनसैनिकांनी सिग्नलवर जाऊन खैरेंचे विधान आणि मनविसेची भुमिका सांगत भस्माच्या पुड्या वाटल्या. यावेळी विविध प्रश्‍नांचे बॅनर गळ्यात अडकवून निषेध नोंदविला. 

मनविसेने म्हटले कि, डॉक्‍टरांच्या शिबीरात असे वक्‍तव्य करुन त्यांनी वैद्यकीय क्षेत्राला बदनाम केले आहे. लोकप्रतिनिधींचे हे वक्‍तव्य धक्‍कादायक असून त्याचा निषेध करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य करणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांना बळ देण्याचे काम सुरु आहे. नाडी तपासून जप करुन पुडी देऊन रुग्ण बरे करतो म्हणणाऱ्या खैरेंनी घाटी रुग्णालयातील आयसीयुत जाऊन बसावे. असा उपहासात्मक टोला लगावला आहे. 
यावेळी मंगेश साळवे, कार्तिक फरकाडे, रितेश देवरे, संदीप राजपुत, गजानन गोमटे, विशाल गोंधळे, नितीन कल्याणकर, शुभम घोरपडे, किरण म्हस्के, प्रशांत आटोळे, रविराज कांबळे आदींची उपस्थिती होती. 

खैरेंवर नोंदवा गुन्हा - जावळीकर 
खासदार खैरेंची दिव्यशक्‍ती बघता, शहरातील पाणी, खड्डे, कचरा, बेरोजगारी हे प्रश्‍न ते का मार्गी लावत नाहीत. त्यांचे वक्‍तव्य अंधश्रद्धा निर्मुलन कायदा 2013 मधील कलम 2 व कलम 11 (अ) अंतर्गत गुन्हा असून पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा. अशी विनंती मनविसेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT