mns
mns 
मराठवाडा

सरकारला हाकलण्यासाठी मनसेचा औरंगाबादेत दंडुका मोर्चा

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : दुष्काळाने मराठवाड्यातील शेतकरी होरपळून निघत आहेत. मागच्या सरकारपेक्षा भाजपा सरकारच्या काळात आत्महत्या दुपटीने वाढल्या आहेत.

कर्जमाफीही फसवी आहे. म्हणून या "हालगट' सरकारला हाकलून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा औरंगाबादेत 27 नोव्हेंबरला विभागीय आयुक्‍त कार्यालयावर दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती मनसेचे उपाध्यक्ष जावेद शेख पत्रकार परिषदेत दिली. दंडुका मोर्चाच्या निमित्ताने मनसेकडून शक्‍तीप्रदर्शन होणार आहे. 

मोर्चाला पैठण गेट पासून मंगळवारी दुपारी बारा वाजता सुरवात होईल. दंडुका मोर्चा हा शेतकऱ्यांचे आत्मबल वाढविणारा असेल. जावेद शेख म्हणाले, आपल्याला रागच येत नाही. म्हणून भाजपाला सत्तेचा माज चढला आहे. आता राग दाखवण्याची वेळ आली आहे. दंडुका घेऊन लढण्यासाठी मराठवाड्यातून शेतकऱ्यांनी यावे, असे आवाहनही करण्यात आले. मोर्चाला राजु पाटील, अभिजीत पानसे, अनिल शिदोरे, शालिनी ठाकरे, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांची उपस्थिती राहणार आहे. 

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कापसाला प्रतिक्‍विंटल 8000 रुपये भाव, स्वामिनाथन आयोग लागू, शेतकऱ्यांच्या मुलांना सरसकट मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना पेन्शन, गत खरीप हंगामातील पिकविमा मिळावा, कोरडवाहु शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार, बागायतदारांना एक लाख अनुदान, चारा छावण्या, मंडळानुसार नव्हे तर संपुर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, कृषिबिले माफ, कर्ज न देणाऱ्या बॅंकांवर कारवाई, बोंडअळीचे अनुदान मिळावे, पाणी टॅंकर सुरु करावे, तिथे प्रतिव्यक्‍ती 50 लीटर पाणी द्यावे, रोजगार हमीचे कामे, उसाला एफआरपीप्रमाणे भाव, शिक्षणशुल्क माफीची अंमलबजावणी अशा प्रमुख मागण्या असणार आहेत. 

आत्महत्या केलेल्या गावी सीएम चषकाचे बॅनरबाजी 
काही दिवसांपुर्वी वैजापुरात एकाने शेतीप्रश्‍नावरुन आत्महत्या केली. त्याच गावात हे सरकार सीएम चषक खेळवत आहे. तिथे बॅनरबाजी होत असल्याने या सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. असल्या निगरगट्ट सरकारवर आम्ही दंडुका उगारणार आहोत. असे मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT