मराठवाडा

मराठवाड्यात यंदा 198 कोटींचे जास्तीचे करसंकलन

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद -  नोटाबंदीनंतर मराठवाड्यात करदात्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. यामुळे प्राप्तिकर विभागाच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा करसंकलनात 21 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 198 कोटी रुपये जास्त आहे. प्राप्तिकर विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे करसंकलन वाढल्याची माहिती प्राप्तिकर विभागाचे प्रधान आयुक्‍त के. पी. सी. राव यांनी बुधवारी (ता. 20) दिली. 

मराठवाड्यात दुष्काळी स्थिती असतानाही कर भरण्यात नागरिकांनी तत्परता दाखवली आहे. यामुळेच विभागाच्या महसुलात घोडदौड सुरू आहे. मराठवाड्यात गेल्यावर्षी 921.7 कोटींचे करसंकलन झाले होते. तोच आकाडा यंदा 198 कोटींनी वाढून 1119.9 कोटींवर गेला आहे. प्राप्तिकर विभागातर्फे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर जनजागृती मोहीम राबविल्याने कर भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही 21 टक्‍के वाढ दुष्काळजन्य परिस्थितीत होणे लक्षणीय असल्याचेही श्री. राव यांनी सांगितले. 

वर्ष-------------------------------------------महसूल 
1 एप्रिल 2017 ते 31 जानेवारी 2018-------- 921.7 कोटी 
----------------------------------------------------- 
1 एप्रिल 2018 ते 31 जानेवारी 2019 ---------1119.9 कोटी 

 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT