Aurangabad Gramin News
Aurangabad Gramin News 
मराठवाडा

जनावरे बांधण्यावरून आईसह मुलास मारहाण, गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड  (जि.औरंगाबाद) : रस्त्याच्या बाजूला जनावरे का बांधत नाही, या कारणावरून आईसह मुलास मारहाण केल्याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपळी (ता. सिल्लोड) येथील फिर्यादी दादाराव दुधे (वय 30) हा त्याच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये सोमवारी (ता. 18) जनावरे बांधत असताना अविनाश राम कोटिये, राम देवमन कोटिये (दोघे रा. उपळी) तेथे आले.

त्यांनी फिर्यादीस जनावरे रस्त्याच्या बाजूला बांधता येत नाहीत का म्हणून शिवीगाळ करीत लोखंडी टॉमीने डोके फोडले. फिर्यादीची आई भांडणे सोडविण्यासाठी गेली असता राम कोटीये यांनी त्यांना काठीने मारहाण केली. याप्रकरणी अविनाश कोटीये, राम कोटीये यांच्याविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजापूर येथे 143 दुचाकीस्वारांवर कारवाई
वैजापूर, ता. 20 (बातमीदार) ः मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध वैजापूर पोलिसांनी मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मागील दोन दिवसांत 143 वाहनांवर कारवाई केली असून, वाहनधारकांकडून 36 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे ट्रिपल सीट, क्रमांक नसणाऱ्या दुचाकी चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वैजापूर शहरात ऐन रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असून वाहतुकीला अडथळा होत आहे.

याशिवाय क्रमांक नसणाऱ्या वाहनांचा वापर, ट्रिपल सीटमुळे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज कुलकर्णी, गृहरक्षक दलाचे नवनाथ कोकाटे, समीर पठाण, विशाल आल्हाट, संदीप आंबिलढगे, आजिनाथ वाळके, पंढरीनाथ रिठे व गणेश दवंगे यांच्या पथकाने मंगळवारी (ता.19) शहरातल्या विविध भागांत 76 वाहनांवर कारवाई करत 22 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी 67 वाहनांवर कारवाई करून 13 हजार 700 रुपये दंड वसूल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT