मराठवाडा

खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - भरधाव खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना केंब्रिज चौकात काल मध्यरात्रीनंतर घडली. मृताची अद्याप ओळख पटली नसून, पोलिसांनी चालकाची चौकशी केली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, यवतमाळहून चाणक्‍य ट्रॅव्हल्सची बस (एमएच-29, एम-2495) मुंबईला जात होती. रात्री दीडच्या सुमारास केंब्रिज चौकात बस आली त्या वेळी अचानक एक दुचाकी (एमएच-20, एपी-6413) बसला आडवी आली. बसचालकाने ब्रेक लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु दुचाकीही वेगात असल्याने तिची बसला धडक बसली. यात दुचाकीस्वाराच्या अंगावरून चाक गेल्याने चेहरा व डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती समजताच पोलिस चौकात पोचले. त्यांनी बससह चालकाला ताब्यात घेतले. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली. मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांनी चालकाची चौकशी केली. विनोद शंकर चव्हाण (रा. मारोडी, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे बसचालकाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

लागोपाठ दुसरी घटना 
अशोक रंगनाथ महाडिक या तरुणाचा खासगी बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र पवन राजेंद्र कापडे गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री खासगी बसच्या धडकेत आणखी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. चोवीस तासांत दोन घटना घडल्या.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT