file photo
file photo 
मराठवाडा

परभणी : वैद्यकीय प्रवेशांच्या सुत्रासाठी खासदार संजय जाधव यांचे स्वातंत्र्यदिनी निदर्शने

गणेश पांडे

परभणी ः वैद्यकीय प्रवेशाचे ७० : ३० टक्के सुत्र रद्द करावे या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी (ता.१५) स्वातंत्रदिनाच्या ध्वजारोहणा आधी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर पालक मंत्री नवाब मलिक यांना सर्वपक्षिय निवेदन सादर करण्यात आले.

राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (NEET) मध्ये पात्र झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रात विभाग निहाय ७० : ३० टक्के वाटा हे सूत्र राबविले जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असे तीन विभाग करून उर्वरित जागांसाठी ७० टक्के वाटा विभागाचा आणि ३० टक्के वाटा राज्याचा या सूत्रानुसार ही प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येते. वास्तविक पाहता मराठवाडा विभागाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागात वैद्यकीय महाविद्यालये व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या किती तरी पटीने जास्त आहे. प्रचलित सूत्रामुळे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थांवर अनेक वर्षापासून अन्याय होत आहे.

हानीकारक आणि त्यापैक्षाही अन्यायकारक

उल्लेखनीय म्हणजे ७०:३० टक्के हे सूत्र देशातील इतर कुठल्याही राज्यात राबविले जात नसून या सूत्रामुळे दरवर्षी मराठवाड्यातील किमान ५०० विद्यार्थी डॉक्टर बनण्यापासून वंचित राहात आहेत. ही बाब शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाडा विभागाच्या दृष्टीने हानीकारक आणि त्यापैक्षाही अन्यायकारक आहे. विशेष म्हणजे  वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही सामाजिक तथा जातीनिहाय आरक्षणानुसार राबविली जात असतांना पुन्हा विभागनिहाय आरक्षण कशासाठी ? हा प्रश्न संपूर्ण प्रवेश मराठवाड्याला गेल्या अनेक वर्षापासून सतावत आहे. ७० : ३० टक्के या सूत्रामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मरावाड्यातील विद्यार्थांना NEET मध्ये पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील विद्यार्थांच्या तुलनेत जवळपास ४० ते ५० गुण अधिक घ्यावे लागतात.

यांची होती उपस्थिती

ही बाब समानतेच्या तत्वाचा भंग करणारी आणि मराठवाड्यातील विद्यार्थांवर घोर अन्याय करणारी आहे. त्यामुळे हे सूत्र रद्द करावे या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री ज्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार होते त्या मार्गावर उभे राहून पालक व शिवसैनिकांनी निदर्शने केली. या आंदोलनात कॉग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर, माजूलाला, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम, माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव,  अर्जून सामाले, डॉ. मारुती हुलसुरे, अॅड. राजकुमार भांबरे, अतुल सरोदे, उध्दवराव देशमुख आदी सहभागी झाले होते.

आंदोलन उग्र रुप धारण करण्या आधी फॉर्मुला रद्द करा

मराठवाडा ही साधू -संताची भूमी आहे. येथील लोक शांत व सयंमी आहेत. मात्र ती चळवळीचे केंद्र आहे हे लक्षात घ्यावे. ७० : ३० टक्केचा फॉर्मुला रद्द करण्यासाठी उभारण्यात आलेले जन आंदोलन हे उग्र रुप धारण करण्या आधीच हा फॉर्मुला रद्द करावा  अन्यथा हे आंदोलन मराठवाडाभर उभारले जाईल.

- संजय जाधव, खासदार, परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT