Aurangabad-Municipal
Aurangabad-Municipal 
मराठवाडा

अहो, मुलीचे लग्न आहे आता तरी थकीत बिले काढा!

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - अहो, माझ्या मुलीचे लग्न आहे, बिले मिळत नसल्याने तारीख काढायला अडचणी येत आहेत. आमचे थकीत बिल काढा, खोटं वाटत असेल तर तुम्हीच कन्यादानासाठी या अशी हतबल होऊन महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटदारांनी आयुक्‍तांपुढे विनवणी केली. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने तब्बल अडीचशे ते तीनशे कोटींची कंत्राटारांची बिले थकली आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही बिले मिळत नसल्याने बुधवारी (ता.आठ) कंत्राटदारांनी आयुक्तांना घेराव घातला. 

महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने कंत्राटदारांची केलेल्या कामांची बिले काढली जात नाहीत. यामुळे ते दुसरी कामे करण्यास धजावत नाहीत. थकीत बिले काढण्याचे नियोजन केले जात नसल्याने ठेकेदार संतप्त झाले आहेत. वेळोवेळी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची भेट घेऊन बिले देण्याची मागणी करण्यात आली आहे. तरीदेखील आयुक्तांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कंत्राटदारांचा संयम संपला आहे. बिल रखडल्यामुळे कंत्राटदारांचेही आर्थिक गणित बिघडले आहे. हातउसने घेतलेले, बॅंकेच्या कर्जाचे हप्त्यांची परतफेड होत नसल्यामुळे त्यांची पत खालावली आहे. त्यामुळे कंत्राटदार सध्या महापालिकेतच ठाण मांडून आहेत. बुधवारी सकाळी आयुक्त डॉ. निपुण विनायक हे त्यांच्या दालनात जाताच कंत्राटदारांनी घेराव घातला. वर्ष होऊनही बिले काढण्यात आलेली नाहीत, आमच्या मुलाबाळांचे लग्न, शिक्षण करण्यास अडचण येत आहे. केलेल्या कामाचे बिल द्यावे अशी मागणी केली. एका कंत्राटदाराने तर मुलीच्या लग्नासाठी तरी बिल काढा हो साहेब, बिल देता येत नसेल तर तुम्हीच मुलीचे कन्यादान करा अशी विनवणी केली. या कंत्राटदाराने डोळ्यात पाणी आणून आपली कैफियत मांडली. आयुक्तांनी मात्र तातडीने बिले देण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT