hingoli
hingoli 
मराठवाडा

आमचं दिवाळं निघण्यापूर्वी सरकारी यंत्रणेने भेट द्यावी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : साहेब कालपासून वीस वेळा भूकंपाचे धक्के जाणवले भर दिवाळीत डोळ्याला डोळा लागला नाही. सणासुदीसाठी आलेले पाहुणे ही भीतीने आपापल्या गावी निघुन गेले. भूकंपासारखा आवाज आमचा मित्र झाला आहे. मात्र आता आमचं दिवाळ निघण्यापूर्वी सरकारी यंत्रणेने सहानुभूतीपूर्वक भेट द्यावी अशी अपेक्षा वापटी येथील सत्तर वर्षीय किसन बापू शिंदे यांनी व्यक्त केली

वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात मागील दोन दिवसांमध्ये भूकंपाचे वीस धक्के जाणवले. एकापाठोपाठ एक झालेल्या भूकंपामुळे तसेच गूड आवाजामुळे गावकऱ्यातून भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत गावातील परिस्थितीचे कथन करताना किसन बापू म्हणाले, आमच्या गावात होत असलेल्या भूकम्पाच्या आवाजाने लहान थोर मंडळीत सध्या भितीच वातावरण आहे. पुढं काय होणार याची कदाचित कुणालाच माहिती नाही. दोन वर्षांपासून होणाऱ्या सततच्या गूढ आवाजाने माझ्या गावासह आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्या गूढ आवाजाची सवयच झालीय. जणूकाही गूढ आवाज रोजचाच मित्र झालाय. पण कालपासून हाच मित्र शत्रू रुपात दिसायला लागलाय..त्याला कारणही तसंच आहे.

कालपासून गूढ आवाजाची तिव्रता वाढत चाललीय...कालपासून तब्बल 20 पेक्ष्या जास्त भूकम्पाचे आवाज झाले .त्यात जास्त जोराचे तीन आवाज झाले.मनात नको त्या प्रश्नांना उत आलाय. गावकरी एकमेकांना साहूनुभूती दाखवत प्रत्येक आवाज दाबण्याचा प्रयत्न करत पुढं चालले आहे अन चालत पण राहतील नैसर्गिक संकटासमोर कुणाचही चालत नाही हे ही माहीत आहे पण सरकारी यंत्रणा ना सहानुभूती देते ना कुठलीही विचारपूस करते. सरकारी यंत्रणेची दिवाळी झाली असेल तर आमचं दिवाळ निघण्याच्या अगोदर एक साहनुभुती पर भेट आमच्या गावाला द्यावी ,येवडीच काय ती अपेक्षा हाय. यंत्रणाच्या भेटीकडे डोळे लाऊन बसल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT