education
education 
मराठवाडा

'आरटीई' आदेशाला ' केंब्रिज' चा खो

सकाळवृत्तसेवा

नांदेड -  शिक्षण हक्क कायद्यान्वये आरक्षणाच्या कोट्यातून चौथीपर्यंत मोफत शिक्षण घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंब्रिज विद्यालयाने पाचव्या वर्गात प्रवेश देण्यासाठी शैक्षणिक शुल्काची मागणी केली आहे. त्यामुळे चौथीतील उत्तीण विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी झाले आहे.

पाल्याला पाचवीच्या वर्गात मोफत प्रवेश देवून आठवी पर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी चौथी वर्गातील उत्तीर्ण झालेल्या पाल्यांच्या पालकांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आरक्षणाच्या कोट्यातून मागासवर्गीय पाल्यांना आठवी पर्यंत मोफत शिक्षण देण्याची तरतूद असतांना शहरातील केंब्रिज प्राथमिक विद्यालयाने शासनाच्या आरटीई आदेशाला केराटी टोपली दाखवली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २०१२- १३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत आरटीई नुसार केंब्रिज प्राथमिक विद्यालयात प्रवेश मिळाला होता. ही मुले यंदा चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. पण त्यांना पाचव्या वर्गात प्रवेशासाठी शैक्षणिक शुल्क मागितले जात आहे. त्यामुळे या विद्याथ्र्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संदर्भात प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी केंब्रिजला पत्राद्वारे मोफत प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. पण केंब्रिजने आदेशाला केराची टोपली दाखवून आपली भूमिका कायम ठेवली.

पाल्याला पाचवीच्या वर्गात मोफत प्रवेश देवून आठवी पर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी चौथी वर्गातील उत्तीर्ण झालेल्या पाल्यांच्या पालक राहूल वाघमारे, संजय गायकवाड, विलास वाघमारे, श्रीरंग एडके, नरेंद्र वाघमारे, उत्तम खंदारे, मनोहर महागडे, राहूल किनीकर यांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT