संगीता दोडके
संगीता दोडके 
मराठवाडा

#NavDurga ‘प्रवासी देवो भव:’ हाच ध्यास

अनिल जमधडे

एसटीचा प्रवासी हेच खरे दैवत आहे. म्हणूनच प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन एसटीची सेवा (देखभाल दुरुस्ती) करण्याला प्राधान्य असते, असे सांगणाऱ्या आणि एसटी बसच्या इंजिनच्या आवाजावरून दोष शोधण्याचे कसब निर्माण करणाऱ्या आजच्या नवदुर्गा आहेत एसटीच्या हेड मेकॅनिक संगीता विशाल दोडके.

कळमनुरी (जि. हिंगोली) येथील रहिवासी असलेल्या शेतकरी कन्या संगीता विशाल दोडके यांनी पूर्वीपासूनच वेगळे काही तरी करण्याचा ध्यास घेतला होता. शिक्षण घेतानाच नेहमीची डिग्री घेण्यापेक्षा हटके काम असले पाहिजे अशी इच्छा होती. म्हणूनच त्यांनी तांत्रिक शिक्षण घेण्याचा निर्णय घेत, परभणीला आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. सर्वसाधारण मुली ड्रेसडिझायनिंग, टेलरिंग किंवा यासारखे मुलींच्या लायक विषय निवडतात; मात्र आपण मुद्दामच मोटार मेकॅनिक कोर्स निवडल्याचे संगीता सांगतात. आयटीआय पूर्ण केल्यानंतर त्या वर्ष २००८ मध्ये एसटी महामंडळाच्या सेवेत दाखल झाल्या. सुरवातीला औरंगाबादच्या विभागीय कार्यशाळेत मदतनीस म्हणून काम केले. महिला मेकॅनिक म्हणून काय काम करणार अशी शंका निर्माण होत होत्या; मात्र प्रामाणिकपणा आणि कामाची सचोटी यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्‍वास संपादन केला. वर्ष २०१५ मध्ये हेड मेकॅनिक म्हणून पदोन्नती मिळाली. सिल्लोड, पैठण आगारांत हेड मेकॅनिक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. सहा महिन्यांपूर्वी सिडको आगारामध्ये (क्रमांक एक) बदली झाली. आगारात काम करताना, बसच्या वेळेत बस दुरुस्ती करून देणे आवश्‍यक असते. एसटी बसमधून रोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे त्या अभिमानाने सांगतात. 

इंजिनच सांगते बिघाड 
एसटी डेपोमध्ये आलेल्या बसची अचूक दुरुस्ती झाली पाहिजे हाच ध्यास असतो. बसचे इंजिन सुरू केल्यानंतर त्यात काय गडबड आहे, याचा अंदाज बांधता येतो. चालकाने बसची केलेली तक्रार आणि बसचे इंजिन काय सांगते (इंजिनचा आवाज) यावरून नेमके काय काम करावे लागणार आहे, हे ठरवता येते.

सफाईदारपणे बसही चालवतात 
संगीता यांच्याकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे. बस दुरुस्तीनंतर त्या सफाईदारपणे ट्रायल घेतात. एसटी बस चालवणे अवघड नाही. भर रस्त्यावरूनही बस चालवण्याचा अनुभव त्यांनी घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT