kalyankar
kalyankar 
मराठवाडा

#NavDurga एका पायाने अपंग, तरी जलसंवर्धनात घेतली उत्तुंग भरारी 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : हात-पाय, दणकट शरीर, पुरेसा वेळ असतानाही अनेकजण जलसंवर्धन, पाणलोट या क्षेत्रात काम करण्यास तयार होत नाहीत. मात्र, पायाने अपंग असतानाही सामाजिक जाणीव ठेवून या क्षेत्रात काम करून वेगळा ठसा निर्माण करण्याचे काम विनया कल्याणकर करीत आहेत. 

जागतिक पातळीवर पर्यावरणाच्या ऱ्हासाची नोंद घेतली गेली असून, आगामी काळात कसे कसे अनेक धोके निर्माण होणार आहेत, हे जगजाहीर आहे. तरीही पर्यावरणाचे संवर्धन करण्याची मानसिकता पाहिजे तशी झालेली नाही. एकूणच समाजजीवनावरच परिणाम करणाऱ्या संकटाचा सामना सामुदायिकरीत्या करण्यासाठी पुढे यायला हवे, ही खूणगाठ मनाशी बांधून एमएसडब्ल्यू व बीएमसीजेचे शिक्षण घेतलेल्या विनया यांनी लोकसाथी प्रतिष्ठान ही बिनसरकारी सामाजिक संस्था सुरू केली. त्याद्वारे शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य, शेतीविकास, नैसर्गिक साधनांचा विकास, स्त्री-पुरुष समानता, भूव्यवस्थापन, जलव्यवस्थापन, वनीकरण, महिला विकास, बचतगटाची स्थापना करून आर्थिक सहायता करणे, महिलांमध्ये आरोग्यासंबंधी जागृती निर्माण करण्याचे काम केले जात आहे. विशेषत: सोयगाव, कन्नड, खुलताबाद, लातूर, उदगीर या ठिकाणी महिलांसाठी विशेष कामे हाती घेतली आहेत. या कामांची दखल घेत अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. 

पाण्यासाठी पुढे यावे 
"जल हेच जीवन' हे केवळ पुस्तकात वाचण्यासाठी नसून त्याचे जतन करण्यासोबतच त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. हे काम मूठभर लोकांनी करून भागणार नसून, जर जीवसृष्टी वाचवायची असेल तर आधी पाणी वाचले पाहिजे. आज शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानेच सर्वच क्षेत्रांची हानी होताना बघायला मिळत आहे. उद्या पाणीच मिळाले नाही तर जगायचे आणि जगवायचे कसे, हा सर्वात मोठा प्रश्‍न जगासमोर असणार आहे. त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन विनया करतात. 

कर्णबधिर, अपंगांचे पुनर्वसन करायचेय 
14 सप्टेंबर 1994 रोजी सायकलवरून अदालत रोडवरून जात असताना एका ट्रकने जोराची धडक दिली. यात ट्रकसमोरच्या चाकाखाली सायकल आल्याने विनयाला उजवा पाय गमवावा लागला. मात्र, त्यावर आपण कधीच मात केली आहे. मानसिक सुदृढता हीच गोष्ट माझ्या दृष्टीने महत्वाची असून आगामी काळात कर्णबधिर, अपंगांचे पुनर्वसन करायचेय, असे त्या सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT