घाटी रुग्णालय
घाटी रुग्णालय 
मराठवाडा

कारवाईचा बडगा, की पुन्हा पांघरुण 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - घाटी रुग्णालयात बंद लिफ्टच्या दारातच सोमवारी (ता. 21) मध्यरात्री महिलेची प्रसूती होऊन बाळ फरशीवर पडून दगावले. या घटनेला "सकाळ'ने वाचा फोडल्यानंतर प्रकरण राज्यभर गाजले. सर्वच स्तरांतून घाटी प्रशासनावर टीकेची झोड उठली; मात्र घटनेला सात दिवस उलटूनही अद्याप यातील दोषी शोधण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. आताही कारवाई होणार, की नेहमीच्या निगरगट्टपणाने यावर व्यवस्थित पांघरुण घातले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे मुंबईतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कारवाईची शक्‍यता वाढली आहे. शनिवारी दिलेल्या नोटिशींत उलट टपाली उत्तर देण्याचे म्हटले आहे. सोमवारी (ता. 28) ही उत्तरे मिळण्याची शक्‍यता असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी स्पष्ट केले होते. उत्तरे मिळाल्यानंतरही नेमकी कारवाई कुणावर होईल, याकडे परिचारिकांसह कर्मचारी व सीएमओंचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी बहुतांश डॉक्‍टरांनी किमान आलेल्या रुग्णाला स्ट्रेचर तरी मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली; तर घाटीने दोन दिवसांपासून आरएमओंकडून या स्ट्रेचरच्या उपलब्धतेवर विशेष लक्ष ठेवले आहे. अपघात विभागात आपत्कालीन प्रसूतीची व्यवस्थाही केली आहे. वर्षभरापासून बंद असलेली लिफ्टही सुरू करीत रात्रीच्या यंत्रणेवर वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने स्वतः लक्ष ठेवून आहेत. अचानक भेटींचे सत्रही सध्या घाटीत सुरू असल्याने एकप्रकारची दक्षता पाहायला मिळत आहे. 
 

प्रशासनाने पाहिले व्हिडिओ फुटेज 
प्रशासनाने सीसीटीव्हीचे व्हिडिओ फुटेज पाहिले. त्यात "ती' महिला सोमवारी मध्यरात्री 12.10 ते 12.20 दरम्यान अपघात विभागात नोंदणी कक्षासमोर उभी दिसते. त्यानंतर नातेवाईक वाहनाचे पैसे देऊन आत येतात. त्यांच्यासोबत गर्भवती महिला स्ट्रेचरशिवाय आत चालत गेल्याचेही स्पष्ट दिसते. 12.34 ला लिफ्टच्या दारातच प्रसूती झाल्याचे दुसऱ्या कॅमेऱ्यात दिसत असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 


 
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आज शहरात आले होते. त्यांची भेट घेऊन त्यांना घाटीत घडलेल्या घटनेची कल्पना दिली. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता त्यांना सांगितली. सेंट्रली आऊटसोर्सिंगची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यातून कर्मचारी देण्याचे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले. उद्या अपघात विभागातील कर्मचारी बदलून जास्तीचे कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहोत. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT