file photo
file photo 
मराठवाडा

आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या ; खर्चापेक्षा 1.94 कोटी उत्पन्न कमी

प्रकाश बनकर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने वर्ष 2018-19 मध्ये विविध विकासकामांवर तब्बल पाच कोटी 28 लाख पाच हजार 913 रुपयांचा खर्च केला; मात्र समितीला केवळ तीन कोटी 33 लाख 98 हजार 647 रुपये उत्पन्न मिळाले. खर्च आणि उत्पन्न यांचा विचार केल्यास एक कोटी 94 लाख रुपयांची तूट आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षातही हीच स्थिती आहे. त्यामुळे "आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या!' अशी बाजार समितीची अवस्था झाली आहे. 


कृषी उत्पन्न बाजार समितीला 2018-19 या वर्षात तीन कोटी 33 लाख 98 हजार 647 रुपये उत्पन्न मिळाले. विकासकामे, इतर गोष्टींसाठीही पाच कोटी 28 लाख पाच हजार 913 रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यातून एक कोटी 94 लाख सात हजार 239 रुपये तूट दिसून आल्याची माहिती समितीच्या सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले. जिल्ह्यात वर्षभरापासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. यात आवक कमी झाली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढले आहे. बाजार समितीने करमाड उपबाजारपेठेला चालना दिली. चारा छावणी सुरू केली. हे आवश्‍यक होतेच; पण सभापती केबिन आणि इतर काही गोष्टींवर अनावश्‍यक खर्च केला. त्यामुळे ही तूट निर्माण झाली आहे. पुढील वर्षीही अशीच तूट असेल असा आरोप कॉंग्रेसच्या संचालकांनी केला आहे. बाजार समितीत एक कोटीचे प्री-कोटेड शेड तयार झाले. करमाडच्या उपबाजारपेठेच्या शॉपिंग सेंटरसाठी 16 कोटी रुपये खर्च केला जात आहे. दोन गोदाम आणि सभापतीच्या केबिनचे काम पूर्ण झाले आहे. 

हेही आहे कारण 
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीने ई-नाम प्रणाली लागू केली. त्यामुळे धान्याची आवक इतर बाजार समितीकडे वळली. परिणामी बाजार समितीचे उत्पन्न घटले. दरम्यान, खर्च वाढल्याने पुढील आर्थिक वर्षातही बाजार समितीचा तोटा वाढण्याची शक्‍यता आहे. 
यंदा बाजार समिती करीत असलेला खर्च 

कामे त्यासाठीचा लागणारा खर्च
मुख्य बाजार समितीला एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे दोन गोदाम 1.15 कोटी रुपये 
मुख्य बाजार आवारात होलसेल फुलांचे मार्केट 40 लाख रुपये 
मुख्य बाजार आवारात मका संकलन केंद्र 50 लाख रुपये
मुख्य बाजार आवारात फळेभाजीपाला मार्केटमधील ओट्यावर प्री-कोटेड शेड 1 कोटी रुपये 
मुख्य बाजार आवारात गेस्ट हाऊस 60 लाख रुपये 
 
भाजीपाला मार्केटमध्ये आदर्श हॉटेलच्या समोर शॉपिग कॉम्प्लेक्‍स  17 कोटी रुपये
फळेभाजीपाला मार्केटमधील मेन रोडचे सिमेंट कॉंक्रिटीकरण 1.50 कोटी रुपये 
करमाड येथील उपबाजारपेठ येथे शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी 16 कोटी रुपये
एकूण 38 कोटी, 15 लाख रुपये

कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे स्वखर्चाने 80 कोटींची कामे करण्यात येत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच 24 कोटी रुपये आम्ही फिक्‍स डिपॉझिट ठेवले आहेत. सरकारचा एकही रुपया न घेता आम्ही समितीचा विकास करीत आहोत. बाजार समितीला कुठलीही तूट आलेली नाही. उलट गेल्या वर्षीपेक्षा सहा लाख 15 हजार 40 रुपयांचा नफा झाला. यासह विकास आराखड्यासाठी 28 लाख रुपये आम्ही भरले. 50 लाखांचा मालमत्ता कर भरला. पेट्रोलपंपाच्या एनओसीसाठी खर्च झाला. आर्किटेक्‍टसाठी खर्च केला आहे. बाजार समितीने स्वनिधी उभा करून हे काम केले जात आहे. 
- राधाकिसन पठाडे, सभापती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT