file photo
file photo 
मराठवाडा

मिटमिट्यात आकडे बहाद्दरांचा सुळसुळाट

अनिल जमधडे

औरंगाबाद : महावितरणच्या धडक मोहिमेत बुधवारी (ता. 13) मिटमिटा परिसरातील गट क्रमांक 157 मध्ये तेरा वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. 


महावितरणतर्फे वीजचोरीच्या विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मिटमिटा येथे कारवाई करण्यात आली. मिटमिटा येथे मोठ्या प्रमाणावर वीजचोरी होत असल्याच्या माहितीवरून महावितरणच्या पथकाने धडक कारवाई केली. या मोहिमेत वीजबिलाची थकबाकी असल्याने एका ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही त्याने वीजचोरी केल्याचे उघड झाले. अन्य बारा ग्राहकांनी अधिकृत जोडणी न घेताच विद्युतवाहिनीवर धोकादायक पद्धतीने आकडे टाकून वीजचोरी केल्याचे उघड झाले.

या सर्व ग्राहकांवर विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. महावितरणच्या शहर विभाग-1 चे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंकर चिंचाणे, सहायक अभियंता संदीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT