परंडा : महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी झालेल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे. व्यासपीठावर सुजितसिंह ठाकूर, पाशा पटेल, प्रा. सावंत, बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर आदी.
परंडा : महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी झालेल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे. व्यासपीठावर सुजितसिंह ठाकूर, पाशा पटेल, प्रा. सावंत, बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर आदी.  
मराठवाडा

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाआड येऊ नये : ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

परंडा (उस्मानाबाद) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. 


परंडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. 14) येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. प्रा. सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार पाशा पटेल, ज्ञानेश्वर पाटील, संजय गाढवे, शंकर बोरकर, दत्ता साळुंके, गौतम लटके, प्रशांत चेडे, बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, अण्णासाहेब देशमख, विजयसिंह थोरात, सुभाषसिंह सद्दीवाल, अनिल सावंत, धनंजय सावंत, ऍड. सुभाष मोरे, ऍड. संतोष सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 


शरद पवार यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत केली असती तर राज्याचे हाल झाले नसते. पवार अनेकवेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजकारणाची सुरवात वसंतदादांचे सरकार पाडून झाली. त्यामुळे त्यांना सरकार पाडण्याचा अनुभव असल्याची टीका ठाकरे यांनी केली. प्रचारात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे फोटो दिसत असले, तरी पाच वर्षांत झालेल्या विकासात शिवसेनेचा वाटा आहे. सरकारमध्ये असलो तरी चुकीचे वाटल्यास बोलतच राहणार. पुन्हा युतीचीच सत्ता येणार आहे, असे सांगून त्यांनी शिवसेनेच्या वचननाम्यातील काही बाबींचा उल्लेख केला. 
 
"निवडणूक म्हणजे बतावणी नव्हे' 
प्रचारसभांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विशिष्ट हातवारे करीत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला उत्तर देत आहेत. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हेही त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. दोघांतील जुगलबंदीचा थेट उल्लेख न करता, ठाकरे यांनी "निवडणूक म्हणजे तमाशातली बतावणी नव्हे' अशा शब्दांत संदेश देण्याचा प्रयत्न केला. उमेदवार प्रा. सावंत, खासदार राजेनिंबाळकर, आमदार ठाकूर, पाशा पटेल आदींनी मनोगत व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT