File photo
File photo 
मराठवाडा

तुळजाभवानीमातेची चैत्री पौर्णिमा यात्रा रद्द

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : श्री तुळजाभवानीमातेची यंदाची आठ एप्रिल रोजीची चैत्री पौर्णिमा यात्रा होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

तुळजाभवानीमातेची चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला असते; मात्र यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चैत्री यात्रा होणार नाही. तुळजाभवानी मातेचे मंदिर १७ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. तुळजाभवानी मंदिर सुरवातीला ३१ मार्चपर्यंत अथवा अनिश्चित काळासाठी सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत भाविकांसाठी बंद करण्याचे आदेश झाले होते; मात्र केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे.

पर्यायाने संचारबंदी असल्याने चैत्री यात्रा यंदा होणार नाही. शहरात सध्या केवळ संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू आहे. नागरिक रस्त्यावर बाहेर पडत नाहीत. चैत्री यात्रा होणार नसल्याने तुळजापूर तीर्थक्षेत्राचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे. शहरातील सर्वच व्यवसायांवर चैत्री यात्रा होणार नसल्याने मोठा आर्थिक परिणाम होणार आहे. तुळजापूर बाजरपेठेत चैत्री यात्रा हा व्यापाऱ्यांचा महत्त्वाचा दुसरा टप्पा असतो.

व्यापारी जागामालकांचे अर्धेभाडे चैत्री यात्रा झाल्यानंतर देतात. चैत्री यात्रेत प्रासादिक वाण, हॉटेल, एसटी महामंडळ, लॉजमालक, तुळजाभवानी मंदिर समिती यांच्यासह पुजारी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय होतात. शहरात हे व्यवसाय मागील पंधरा दिवसांपासून ठप्प आहेत. १५ एप्रिलपर्यंत तुळजाभवानी मंदिर सध्यातरी बंद आहे. यापुढे मंदिर भाविकांसाठी केव्हा खुले होईल, याबाबत निश्चित आज कोणत्याही परिस्थितीत सांगता येत नाही.

तुळजाभवानी मंदिर दुष्काळात तसेच कोणत्याही रोगराईच्या वेळी आजपर्यंत बंद झालेले नव्हते; मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर चैत्री यात्रा होणार नसल्याचा मोठा परिणाम होणार आहे.

तुळजापूर शहरामध्ये ग्रामीण भागातील अनेक दुग्ध व्यावसायिक दुधाची विक्री करतात. संगमनेर, सोलापूर यासह अनेक भागांतून दुध विक्रीसाठी येते; मात्र दुधविक्रीही सध्या कमी झाली आहे. चैत्री यात्रा होणार नसल्याने दुग्ध विक्रीचे चैत्री यात्रेतील नियोजन कोलमडून पडलेले आहे. 

तुळजाभवानीमातेची चैत्री यात्रा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर होणार नाही. यापूर्वी तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलेलाच आहे. 
- योगिता कोल्हे, सरव्यवस्थापिका, तुळजाभवानी मंदिर समिती 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT