उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे sakal
मराठवाडा

मोदींमुळे आम्ही नव्हे, बाळासाहेबांमुळे मोदी; उद्धव ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

औसा : ‘‘भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी हे नरेंद्र मोदींना बाजूला करीत असताना संपूर्ण भारतातून फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना वाचविले होते. बाळासाहेबांमुळे मोदी आज दिसत आहेत आणि ते आज आम्हाला सांगत आहेत की, आम्ही मोदींच्या फोटोमुळे निवडून आलो. मोदींमुळे आम्ही नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मोदी आहेत’’, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला

जनसंवाद यात्रेनिमित्त गुरुवारी (ता.सात) येथे झालेल्या कार्यक्रमात ठाकरे यांनी भाजपच्या केंद्र व राज्यातील महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे, मिलिंद नार्वेकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेना फोडून भाजपला वाटले, की शिवसेना आता संपली. पण भाजपला संपवून, गाडून, मूठमाती देऊन शिवसेना पुढे जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढतात. तिकडे मणिपूर, काश्मीर, आसाम धगधगत असताना मात्र ते शेपूट घालून बसतात. याला ‘शेपूटघाल्या गृहमंत्री’ म्हणतात. ‘भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजप धर्म वाढवावा’ अशी नीती सध्या भाजपमध्ये सुरू आहे.

सर्वाधिक भ्रष्टाचारी भाजपच

काँग्रेसने सत्तर वर्षे देशाला लुटले, असा आरोप भाजप करीत आहे. मात्र, काँग्रेसच्या कार्यकाळात निवडणूक रोख्यांच्या स्वरूपात सातशे कोटी रुपये काँग्रेसच्या तिजोरीत आले आहेत, तर दहा वर्षांत भाजपच्या तिजोरीत सहा ते सात हजार कोटी आले. मग नेहरू-काँग्रेसने देश लुटला की भाजपने, हे लोकांनी ठरवावे. महाराष्ट्र हा गुजरातमधून चालविला जातोय. गद्दारांना पन्नास कोटी रुपये द्यायला आहेत, मात्र शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT