Officials dismissed the order of the Guardian Minister about water supply
Officials dismissed the order of the Guardian Minister about water supply 
मराठवाडा

पालकमंत्र्याचे 'नायक' स्‍टाईल आदेश अधिकाऱ्यांनी 'सिंघम' स्‍टाईल धुडकावले

मंगेश शेवाळकर

हिंगोली : जिल्‍ह्‍यात टंचाईग्रस्‍त गावातून तातडीने उपाय योजना करण्याचे पालकमंत्र्यांनी नायक स्‍टाईल दिलेले आदेश अधिकाऱ्यांनी सिंघम स्‍टाईलने धुडकावले. त्‍यामुळे पालकमंत्र्यांचा दौरा वांझोटा ठरल्‍याचे चित्र दिसू लागले आहे.

जिल्‍ह्‍यात यावर्षी तीव्र पाणीप्रश्न निर्माण झाला असून सध्याच्‍या स्‍थितीत 55 हजार लोकसंख्या टँकरच्‍या पाण्यावर अवलंबून आहे. टंचाई उपाय योजनेसाठी 44 टँकर सुरु असून सुमारे पाचशे विहिर व विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्‍यातून गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात असला तरी टँकरने पुरवठा केले जाणारे पाणी दुषित असल्‍याचा आरोप केला जात आहे. 

दरम्‍यान, पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी (ता.9) व शुक्रवारी (ता.10) जिल्‍ह्‍याला भेट देवून टंचाईग्रस्‍त भागांची पाहणी केली. यावेळी त्‍यांनी कळमनुरी तालुक्‍यातील शिवणी येथे तातडीने शुद्ध पाण्याचे टँकर सुरु करण्याच्‍या सूचना दिल्‍या. रामवाडी येथेही कामाची पाहणी केली. हिंगोली तालुक्‍यातील जयपूरवाडी, माळसेलू येथे बैठका घेवून या भागात टँकर वाढून देण्याच्‍या सूचना बैठकीतूनच जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिल्‍या. त्‍यानंतर औंढा तालुक्‍यातील येहळेगाव येथे भेट देवून चारा छावणी सुरु करा व टँकरऐवजी जलवाहिन्या टाकून तात्‍पुरती नळ योजना सुरु करण्याच्‍या सूचना दिल्‍या. वसमत तालुक्‍यातील आंबा येथे गावकऱ्यांनी तीव्र टंचाईची भीषणता दाखवून दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्वासक्षम स्‍पिकर ऑन करून मोबाईलवर जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्‍याशी संपर्क साधला. कुठल्‍याही परिस्‍थितीत शनिवारी (ता. 11) सकाळी दहा वाजता टँकर पोहोचले पाहिजे असा आदेश अधिकाऱ्यांना दिला. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्‍या नायक स्‍टाईल कामामुळे अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला. आता पाणीप्रश्न सुटणार असे बोलले जावू लागले. मात्र पालकमंत्र्यांचे नायक स्‍टाईल आदेश अधिकाऱ्यांनी सिंघम स्‍टाईल धुडकावून लावले. कळमनुरी तालुक्‍यातील शिवणी येथे तीन दिवसानंतरही शुद्ध पाण्याचे टँकर पोहोचले नाही. हिंगोली तालुक्‍यातील जयपूरवाडी, माळसेलू येथे टँकर वाढले नाहीत तर औंढा तालुक्‍यातील येहळेगाव सोळंके येथे चारा छावणी सुरु झाली नाही. तर तीन दिवसानंतर तात्‍पुरत्‍या योजनेच्‍या हालचाली सुरु झाल्‍या नाहीत. वसमत तालुक्‍यातील आंबा येथे शनिवारी सकाळी दहा वाजता टँकर मिळणे अपेक्षित असताना रविवारी (ता.१२) सायंकाळपर्यंत टँकर आलेच नाही. त्‍यामुळे पालकमंत्र्यांच्‍या दुष्काळी पाहणी दौरा वांझोटा ठरल्‍याचे बोलले जावू लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT