One arrested with eight swords Local crime branch action
One arrested with eight swords Local crime branch action 
मराठवाडा

आठ तलवारीसह एकाला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : लोकसभा व रामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या अावळणे सुरू केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकांनी गुरूद्वारा चौकातून सोमवारी (ता. 18) रात्री एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ तलवारी जप्त केल्या. आरोपीला वजिराबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. 

सध्या लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यातच येणाऱ्या काळात रामनवमी, भीमजयंती आणि हल्लबोल अशी महत्वाचे उत्सव येत आहेत. या काळात जिल्ह्यात व शहरात कुठेही कायदा व सुवस्था बाधीत होणार नाही, याची काळजी पोलिस अधिक्षक संजय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे हे घेत आहेत. तशा सुचना आपल्या यंत्रणेला त्यांनी दिल्या आहेत. फरार व पहिजे आरोपींना अटक करून कारागृहात पाठवा असे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल निकाळजे यांना दिल्या. यावरून श्री. निकाळजे यांनी आपले सहकारी अधिकारी एपीआय विनोद दिघोरे यांना सुचना दिली. यावरून श्री. दिघोरे यांनी फौजदार सदानंद वाघमारे, जसवंतसिंग साहू, दशरथ जांभळीकर, दारासिंग राठोड, तानाजी येळगे, विजय आडे, राजू पिलेवाड , दत्ता जाधव, बालाजी सातपुते, राजू पांगरीकर, ब्रम्हानंद लामतुरे आणि घुंगरुसिंग टाक यांनी रात्री गस्त घालून विनापरवानगी आठ तलवार घेऊन जाणाऱ्या रत्नपाल आनंदराव माने  (वय 22) रा. संभाजी चौक, सिडको, नांदेड याला अटक केली. त्याच्याकडील तलवारी व एक हॉकी स्टीक जप्त करून वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. गौस हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT