आडुळ ता : उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. औरंगाबाद, जि. औरंगाबाद) शिवारातील हॉटेल गीतांजलीसमोर सोमवारी (ता. 22) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
रोहित श्याम तरटे (वय 15, रा. पिंपळगाव पांढरी, ता.औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. रोहित वडिलांचा जेवणाचा डबा दुचाकीवरून (एम एच 20 सीडब्ल्यू 6940) घेऊन जात असताना पिंपळगावाहुन कचनेर फाट्याकडे जात असताना हॉटेल गीतांजली समोर उभा असलेला ट्रकला (एमएच 18 एए 3957) दुचाकी पाठीमागून धडकली.
यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला. या अपघाताची नोंद करमाड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे पोलिस निरीक्षक आजीनाथ रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार बाबाराव होळंबे, शेख आवेज तपास करीत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.