नांदेड : एक लाखात चार बनावट सोनसाखळ्या देऊन फसवणूक करणाऱ्या अनोळखी दोघांवर हिमायतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हिमायतनगर परिसरात 11 डिसेंबर रोजी घडला. याप्रकरणी बुधवारी (ता. १९) गुन्हा दाखल झाला.
हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर बोरी टी पॉईंटवर परमेश्वर राघोजी हुंगाळे रा. ढाणकी, ता. उमरखेड (यवतमाळ) यांचे कापड दुकान आहे. या दुकानावर दोन अनोळखी भामटे गेले. दुकानादाराला विश्वासात घेऊन आमच्याकडे सोन्याच्या साखळ्या आहेत. एक लाखात चार सोनसाखळ्या देतो. तुम्हाला पाहिजे असतील तर एक लाख रुपये द्या असे म्हणून निघून गेले. हे कोणाला काही सांगू नका. यानंतर 11 डिसेंबर रोजी या भामट्यांनी मोबाईलवर फोन लावून आम्ही या फाट्यावर आलोय तुम्ही या. यावेळी लालचेत फसलेला व्यापारी एक लाख रुपये घेऊन गेला. त्या भामट्याना एक लाख रुपये दिल्यानंतर त्यांनी चार सोनसाखळी त्यांच्या हातात दिल्या.
घरी गेल्यानंतर त्या साखळ्या बनावट असल्याचे त्यांना समजले. आपलीच बदनामी होईल, म्हणून त्यांनी कुठेच वाच्यता केली नाही. शेवटी त्यांनी हिमायनगर ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार काळे हे करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.