मराठवाडा

नांदेड - विनयभंग करणाऱ्याला पोक्सोंतर्गत सहा महिने शिक्षा

प्रल्हाद कांबळे

नांदेड - शाळकरी मुलीचा रस्त्यात अडवून विनयभंग करणाऱ्या आरोपीस पोक्सोंतर्गत येथील सत्र न्यायाधिश (पाचवे) यांनी सहा महिणे शिक्षा व अडीच हजाराच्या दंडाची मंगळवारी (ता. २३) शिक्षा सुनावली.

सांगवी (बु) परिसरात राहणारी एक शाळकरी मुलगी दररोज सायकलने ये- जा करीत असे. परंतु तिला रस्त्यात अडवून तिच्याशी लगट करम्याचा पर्यत्न करण्याचा मागील काही दिवसापासून सोपान सिध्दार्थ खिल्लारे रा. अंबानगर, सांगवी हा पाठलाग करीत असे. एवढेच नाही तर त्याने ता. एक ऑगस्ट २०१६ रोजी नाला नगर पाटीजवळ तिचा विनयभंग केला. त्यानंतर पुन्हा २६ मे २०१६ रोजी सकाळी रेल्वे विभागीय कार्यालयासमोर विनयभंग केला. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात ता. दोन ऑगस्ट २०१६ रोजी विनयभंग व पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास फौजदार सविता खर्जुले यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणात चार साक्षिदार तपासले. त्यानंतर आरोपी सोपान खिल्लारे याला सहा महिने शिक्षा व रोख अडीच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीला पुढच्या न्यायालयात जाण्याची मुभा असल्याचे त्यांनी आदेशात नमुद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT