Crime news
Crime news  esakal
मराठवाडा

Crime News : अल्पवयीन विवाहितेवर बलात्कार; एकास अटक, बालविवाह प्रकरणी पतीवर गुन्हा

हबीबखान पठाण

पाचोड - पती कामावर गेल्यानंतर अल्पवयीन विवाहीता घरात एकटीच असल्याचे पाहून सतरा वर्षीय विवाहीतेवर घरात घुसून एका युवकाने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.१७) रात्री साडे दहाच्या वाजेच्या सुमारास केकत जळगाव (ता.पैठण) येथे घडली असून, पाचोड पोलिसांनी गुरुवारी (ता.१८) संबंधीत युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. तर अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

यासंबंधी अधिक माहिती अशी, केकत जळगाव (ता. पैठण) येथील सतरा वर्षीय मुलीचे दोन वर्षापूर्वी गावांतील एका तरुणासोबत लग्न झाले होते. तिचा पती एका ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नोकरीवर कामास आहे. बुधवारी (ता. १७) सदर अल्पवयीन विवाहीतेचा पती कामावर गेल्यानंतर सदर विवाहीता घरी एकटीच होती.

ती रात्री दहा वाजेच्या सुमारास जेवण वैगरे करून घराचा दरवाजा ढकलून झोपी गेली असता गावांतील अमोल उर्फ गोट्या अशोक थोरे हा घरात आला व त्याने बळजबरीने अतिप्रसंग केला. ती आरडाओरडा करून विरोध करीत असताना अमोल थोरे याने जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बळजबरीने बलात्कार केला.

रात्री उशीरा सदर पिडीत विवाहीतेचा पती कामावरून घरी आल्यावर त्याने दरवाजा वाजविला असता अमोल उर्फ गोट्या अशोक थोरे हा घरात कूलरच्या मागे लपून बसला. मात्र सदर पिडितेने सर्व कैफियत पतीला सांगितली, तेव्हा पतीने अमोल यांस तु आमच्या घरी कशाला आला? असे विचारले, तेव्हा त्याने तुमच्याकडे काम आहे असे सांगितले.

यांच्यातील शाब्दीक चकमक ऐकून तिच्या सासरचे सदस्य तेथे दाखल झाले व त्यांनी अमोल यास मारहाण करून धरून ठेवले व ११२ या टोलफ्रि क्रमांकावर संपर्क साधला. तोच पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पोलिस उपनिरीक्षक राम बारहाते व त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले असता अमोल थोरे यांस त्यांनी ताब्यात घेतले.

गुरुवारी (ता. १८) पिडीत विवाहितेच्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी अमोल उर्फ गोट्या थोरे विरुद्ध बलात्कार, अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, बालकांचे लैंगिक संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो), जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. तर पतीविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा सन २००६ (९) अन्वये गुन्हा दाखल केला. पैठणचे उपविभागिय पोलिस अधिकारी सिध्देश्वर भोरे, सपोनि शरदचंद्र रोडगे, पोलिस उपनिरीक्षक राम बारहाते, ज्ञानेश्वर राडकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर भोरे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT