Pankaja Munde
Pankaja Munde 
मराठवाडा

पक्ष कोणता ते बघू नका, माणूस बघा: पंकजा मुंडे

सकाळवृत्तसेवा

लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या सभेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पक्षाचा विचार करू नका चांगल्या माणसाचा विचार करा, असा संदेश राज्यभरातल्या कर्मचारी युनियनला दिला आहे. 

लातूर जिल्ह्यात आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होते. औसा तालुक्यातले कार्यक्रम आटोपल्यानंतर पंकजा मुंडे यांची लातूर शहरात मोठी सभा झाली. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन आणि महिला बचत गटाचा संयुक्त मेळावा लातुरात घेण्यात आला. यावेळी राज्यातल्या अनेक जिल्ह्यातले ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सकाळपासूनच लातुरात हजेरी लावली होती वीस हजारांपेक्षाही जास्त संख्या असलेल्या या सभेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पक्ष पाहू नका माणूस बघा आणि चांगल्या माणसाचाच प्रचार करा असं विधान करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा देत पीएफ आणि ग्रॅच्युइटीचा निर्णय घेणार असल्याची घोषणा केलीय. मी राजकारणात आले ते फक्त विधात्यासोबत भांडण आहे म्हणून! गरिबांचा नेता तुम्ही घेता. त्यामुळं त्या विधात्यासॊबत माझं भांडण होतं. ज्या दिवशी मुंडेसाहेबांना  मी अग्नी दिला त्याच दिवशी  मी शपथ घेतली कि गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीच विसरू देणार नाही, असे म्हणत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT