सोयाबीन
सोयाबीन 
मराठवाडा

Parbhani : हंगामापूर्वीच सोयाबीन दरात मोठी घसरण

सकाळ वृत्तसेवा

मानवत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात बुधवारपासून या हंगामातील सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. दरम्यान, मागील महिन्याभरात सोयाबीन दरात मोठी घसरण सुरू असून, नव्या सोयाबीन मालास सरासरी साडेचार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत.

तालुक्यात कापूस हे मुख्य पीक. परंतु, मागील दहा वर्षांत सोयाबीन क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. यावर्षी १२ हजार ८९६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे. सध्या हे पीक अंतिम टप्प्यात असून, पुढील पंधरवड्यात या पिकाची काढणी होणार आहे. परंतु, मागील महिन्याभरात सोयाबीन दरात मोठी घसरण झाली आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत हे दर सरासरी ६ हजार ते ६ हजार ५०० दरम्यान स्थिर होते.

या नंतर या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. या दरात तब्बल दोन हजारांची घसरण होऊन दर ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० वर आले आहेत. विशेष बाब म्हणजे दरात मोठी तेजी येईल. या आशेवर काही शेतकऱ्यांचे गतवर्षीचे सोयाबीनदेखील विक्रीअभावी घरातच आहे. मंगळवारी येथील बाजार समिती यार्डात सोयाबीन मालास आद्रतेनुसार कमाल ४ हजार ३०० ते कमाल ४ हजार ७०० दर मिळाला. दरात घसरण झाल्याने बहुतांश शेतकरी आपल्या माल टप्प्याटप्प्याने विक्री करतील असा अंदाज आहे. दुसऱ्या बाजूला कापूस दरातदेखील तेजी सांगितले जात असल्याने सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना बाजार भाव वाढण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

यावर्षी सोयाबीन उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. बियाणे चार हजार रुपये प्रति बॅग, कापणीसाठी चार हजार रुपये प्रति बॅग, काढणीसाठी चार हजार रुपये प्रति बॅग, या व्यतिरिक्त निंदणी, फवारणी, वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या तुलनेत दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT