Parbhani biogas project Power generation from wet garbage
Parbhani biogas project Power generation from wet garbage sakal
मराठवाडा

परभणी : ओल्या कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती

सकाळ वृत्तसेवा

परभणी : महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. लवकरच येथे वीज निर्मिती प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती उपमहापौर भगवान वाघमारे यांनी दिली.

महापालिकेचा गंगाखेड रस्त्यावर बोरवंड शिवारात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाची कामे प्रगतिपथावर आहेत. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस, विद्युतनिर्मिती व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून शहराची घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. या प्रकल्पाला रविवारी उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त देविदास पवार यांनी भेट देऊन कामाचा आढावा घेत घेतला. सुरू झालेल्या बायोगॅसची त्यांनी माहिती घेतली व कामाची गती वाढवून प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी घनकचरा व्यवस्थापक मिर्झा तनवीर बेग यांना केल्या. यावेळी नगरसेवक सुनील देशमख, संकीर्ण विभाग प्रमुख राजकुमार जाधव, विद्युत अभियंता सोहेल सिद्दिकी आदी उपस्थित होते.

दहा टन कचऱ्यावर प्रक्रियेची क्षमता

या प्रकल्पावर १८ कोटींपेक्षा अधिक खर्च होणार असून, या प्रकल्पाची रोज दहा टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस व विद्युत निर्मिती केली जाणार आहे. बायोगॅस निर्मितीचे कामदेखील सुरू झाले आहे तर सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. सद्यःस्थितीत शहरातून दीड ते दोन टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरात दररोज १०० ते १२५ टन कचरा निर्मिती होते. प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

बोरवंड येथील प्रकल्पात बायोगॅस निर्मिती सुरू झाली आहे तर उर्वरित सुक्या कचऱ्यावर प्रक्रियेची कामे व विद्युत निर्मितीची कामे सुरू होतील. शहरातून संकलित कचरा तेथे पाठवला जात आहे. धार रोडवरील डपिंग ग्राउंडवरील कचऱ्यामुळे नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत होते. परंतु, आता धाररोडवरील डपिंग ग्राउंड बंद केले जाणार आहे.

- भगवान वाघमारे, उपमहापौर, महापालिका, परभणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT