PRB20A03300
PRB20A03300 
मराठवाडा

परभणीतील आयआयटीयन्स ‘थ्री इडियट्स’चा ऑनलाइन स्पोर्ट्स कोचिंगचा नवा प्लॅटफॉर्म 

सकाळ वृतसेवा

परभणी ः भारतीय प्राद्योगीक संस्थेसह विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआऊट झालेल्या तीन ध्येयवेड्या अभियंत्यांनी पारंपरिक कार्पोरेट क्षेत्राची वाट न शोधता अगदी परस्परभिन्न, हटके क्षेत्राची निवड करून त्यातच करिअर करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. ‘क्रीडाज्’ हे संकेतस्थळ ते विकसित करीत असून देशभरातील खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, पालकांसाठी ते दिशादर्शक ठरणार आहे. 

अभिनेता अमिरखान यांच्या ‘थ्री इडियट’ या चित्रपटाला साजेल अशीच वाट परभणीतील तीन अभियंत्यांनी निवडली. येथील बाल विद्यामंदिरचे तीन वर्ग मित्र. स्वप्निल प्रशांत जोशी याने आयआयटी हैद्राबाद येथून इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगची पदवी प्राप्त केली. वेदांत अरुण देशपांडे याने इलेक्ट्रॉनीक्समध्ये तर गौरव गोपीनाथ दळवी याने इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीमध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. हे सर्व चोखंदळ वर्ग मित्र सातत्याने संपर्कात होते. पदवी हातात पडल्यानंतर स्वप्निल व वेदांत यांनी तर गलेलठ्ठ पगार, कार्पोरेट जगाच्या मोहात न पडता कुठल्या तरी क्षेत्रात व वेगळे काही निर्णय घेतला तर गौरवने देखील नोकरी सोडून त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

क्रीडा क्षेत्रासाठी कार्य करण्याचा निश्चय 
गत वर्षभरात ते विविध क्षेत्रांचा बारकाईने अभ्यास करीत होते. त्यामध्ये त्यांना खेळ जगतातील काही त्रुटी दृष्टीपथास आल्या. लोकसंख्येच्या तुलनेत खेळाडूंचे व्यस्त प्रमाण, खेळ, प्रशिक्षण, साधनसामुग्री, क्रीडांगणांच्या अभावाबरोबरच पालक, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा देखील त्यांनी अभ्यास केला. त्यातून त्यांना हे क्षेत्र आव्हाणात्मक वाटले व हे क्षेत्र निवडले. आपले मामा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर प्रा.डॉ. माधव शेजुळ, रणजीत काकडे, प्रा. संतोष कोकीळ यांच्यासह राज्यातील क्रीडा क्षेत्रातील तज्ञांशी संपर्क करून चर्चा केली, माहिती घेतली. अन् त्यातूनच जन्माला आले ‘क्रीडाज’ हे संकेतस्थळ. 

काय आहे क्रीडाज् संकेतस्थळावर 
गुगलवर ‘क्रीडाज’वर खेळ, प्रशिक्षकांची माहिती मिळते. सध्या त्यावर प्रायोगिक तत्वावर योगा, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुध्दिबळ, क्रिकेट या पाच खेळांचा समावेश करण्यात आला. त्या खेळाच्या प्राथमिक माहितीसह नवागतांसह पारंगत असलेल्या खेळाडूंसाठी नवनवीन विकसित केली गेलेली कौशल्ये थेट मैदानावरून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून शिकवली जाणार आहेत. खेळाडू अगदी घरबसल्या त्या-त्या खेळांचा सराव करू शकतात. 

खेळाकडे बघण्याचा पालक, विद्यार्थ्यांचा दृष्टीकोण दुय्यम 
राज्यासह देशात अजुनही खेळाकडे बघण्याचा पालक, विद्यार्थ्यांचा दृष्टीकोण दुय्यमच आहे. खेळातही करिअर होऊ शकते. हे अनेक पालकांच्या अजुनही लक्षात येत नाही. त्यासाठीच्या जनजागृतीसह सर्वसामान्य खेळाडूंना देखील त्यांच्या आवडत्या खेळातील हवी ती कौशल्ये सहगजगत्या, घरबसल्या प्राप्त होतील. येत्या शैक्षणिक धोरणात क्रीडा क्षेत्राला मोठा वाव देण्यात आला त्यासाठी देखील आमचे संकेतस्थळ पुरक ठरणार आहे. - स्वप्निल जोशी, संस्थापक ‘क्रीडाज्’, परभणी.  

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT