Passport
Passport 
मराठवाडा

लातूरला पासपोर्ट कार्यालय अखेर सुरु

सुशांत सांगवे

लातूर : गेल्या आठ महिन्यांपासून लातूरकर पासपोर्ट सेवा केंद्राच्या प्रतिक्षेत आहेत, हे समजताच भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी लातूरमधील पासपोर्ट सेवा केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाला दिले. त्यानंतर काही तासांतच लातूरमधील कार्यालय सुरूही झाले. कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आणखी वेळ वाया घालवू नका. आधी कामकाज सुरू करा, असेही मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे एका रात्रीत हे कार्यालय सुरु झाले.

लातूरमधील पासपोर्ट सेवा केंद्र मार्च महिन्यात सुरू होणार होते. तशा घोषणाही झाल्या होत्या. त्यानूसार टपाल विभागाने पासपोर्ट सेवा केंद्रासाठी जागाही उपलब्ध करून दिली. या जागेचे कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. संगणकीय यंत्रणा बसविण्यात आली. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. इतक्या तयारीनंतरही हे सेवा केंद्र कुलूपबंद स्थितीत आहे. ते नेमके कधी सुरू होणार, याबाबत लातूरकरांना ना लातूरमध्ये, ना पुण्यातील पासपोर्ट कार्यालयात माहिती मिळत नव्हती. म्हणून 'सकाळ'ने डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना लातूरमधील वस्तूस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी येथील पासपोर्ट सेवा केंद्र आम्ही तातडीने सुरू करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर काही तासांतच हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

गांधी चौकातील टपाल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर हे पासपोर्ट सेवा केंद्र आहे. या कार्यालयावर अद्याप फलकही लागलेला नाही. याचे उद्घाटनही झालेले नाही. ही कामे नंतर होतील. आधी लोकांची कामे करा, असा आदेश पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाला आल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली. त्यामुळे या पासपोर्ट सेवा केंद्राची बुधवारी (ता. १०) रात्री उशिरापर्यंत तांत्रिक कामे सुरू होती. ती पूर्ण झाल्यानंतर आजपासून (ता.11) सेवा केंद्र सुरू झाले आहे. दिवसभरात २५ जणांनी येथे आपले अर्ज दाखलही केले. या सेवा केंद्रामुळे सोलापूर, नांदेड, बीड, पुणे, नागपूर येथे होणारी लातूरकरांची पायपीट पूर्णपणे बंद झाली आहे. शिवाय, वेळ आणि पैसेही वाचणार आहे.

दसऱ्यादिवशी उद्घाटन
देशातील सर्व प्रमुख शहरांत पासपोर्ट सेवा केंद्राचे जाळे पसरवण्याचा निर्णय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने घेतला आहे. त्यानूसार पासपोर्ट सेवा केंद्र उभारले जात आहेत. या केंद्राचे उद्घाटन त्या-त्या भागातील खासदारांच्या हस्ते करण्याची प्रथा आहे. त्यानूसार लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची तारीख घेण्यात आली. दसऱ्यादिवशी (ता. 18) हे कार्यालय सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT