Plane
Plane 
मराठवाडा

मराठवाड्याच्या विमानसेवेची उपेक्षाच

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी नवीन विमान कंपन्यांनी शहरातून सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, मुंबई विमानतळावर स्लॉट मिळत नसल्याने विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 

मुंबई विमानतळावरून देश-विदेशांत उड्डाणे होतात. त्यामुळे मुंबई विमानतळावर विमानांची प्रचंड गर्दी वाढत आहे. व्यस्त वेळापत्रकातून नवीन विमानसेवेला स्लॉट देण्याचे काम अवघड झाले आहे. राज्यातील विविध शहरांतील गरजेनुसार विमानांना स्लॉट देणे आवश्‍यक असते. त्यामुळे मराठवाड्यातून नवीन विमानसेवेसाठी स्लॉट देण्यास मुंबई विमानतळ प्राधिकरण अधिक इच्छुक नाही. त्यामुळेच औरंगाबादेतून नवीन विमानसेवा सुरू करण्यात अडचणी आहेत. औरंगाबादेतून जवळपास हजार ते दीड हजार प्रवाशांना खासगी वाहन, रेल्वे, बसने मुंबई जवळ करावी लागत आहे. मुंबई येथून दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, जयपूर यासह देश-विदेशांत विमानसेवा असल्याने औरंगाबादेतील प्रवाशाला किमान मुंबईपर्यंत तरी कनेक्‍टिव्हिटी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा आहे. विविध कामानिमित्त मुंबईला जाणारे आणि मुंबईहून देशभरात जाण्याची सोय असल्याने शहरातून किमान दोन विमाने नव्याने सुरू होऊ शकतील असा प्रवासी वर्ग उपलब्ध आहे. 

खासगी विमानांची तयारी 
औरंगाबाद-मुंबई विमानसेवा देण्यासाठी स्पाइस जेट व इंडिगो एअरलाइन्स या दोन कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र, मुंबई विमानतळावर स्लॉट मिळत नसल्याने नवीन विमानसेवा सुरू करण्यात अडथळे निर्माण झाल्याने मुंबईमध्ये स्लॉट मिळावा यासाठी विमानतळ प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे.

नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी काही कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र, मुंबईत स्लॉट मिळत नाही, त्यामुळे अडचणी येत आहेत. असे असले तरीही मुंबईत स्लॉट मिळावा यासाठी विमानतळ प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. 
- डी. जी. साळवे, विमानतळ निदेशक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT