तीर्थपुरी : शशिकांत बोबडे व गणेश बोबडे या बंधूंनी सुरू केलेला ठिबक सिंचन पाइप रिसायकलिंगचा उद्योग.  
मराठवाडा

तीर्थपुरीच्या शेतकरी बंधूंचा रिसायकलिंग उद्योग 

तुकाराम शिंदे

तीर्थपुरी (जि. जालना) - ठिबक सिंचनाच्या वेस्टेज पाइपचे रिसायकलिंग करणारा उद्योग तीर्थपुरीच्या शशिकांत बोबडे व गणेश बोबडे या शेतकरी बंधूंनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून जुने ठिबक सिंचन घेऊन अल्पदरात नवे ठिबक दिले जाते. त्यामुळे या उद्योगाला चांगलीच उभारी मिळाली आहे. 

घनसावंगी तालुक्‍यातील तीर्थपुरी येथील शशिकांत बोबडे या तरुणाचा गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ठिबक सिंचन विक्री करण्याचा व्यवसाय आहे. या भागातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जुने खराब झालेले ठिबक सिंचन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेतकरी हे जुने ठिबक 7 ते 10 रुपये प्रतिकिलो या दराने भंगारात विक्री करत होते. परंतु या ठिकाणी ठिबक सिंचन रिसायकलिंग करण्याचा व्यवसाय सुरू केला तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, या हेतूने जुने ठिबक सिंचन पाइप रिसायकलिंग करण्याचा उद्योग सुरू केला.

शेतकरी या ठिकाणी जुने ठिबक सिंचन पाइप घेऊन येतात. त्यांना या ठिबकपासून नवीन ठिबक सिंचन बनवून दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांकडून तीनशे मीटर ठिबक सिंचनच्या नळीसाठी सातशे ते नऊशे रुपयांपर्यंत खर्च घेतला जातो. ज्या शेतकऱ्यांना ठिबक घ्यायचे नाही त्यांच्याकडून जुने ठिबक 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. 

दीड वर्षापूर्वी सुरू केला उद्योग 

तीर्थपुरी येथे हा उद्योग सुरू करण्यापूर्वी ठिबक निर्मिती करणाऱ्या विविध प्लॅन्टना बोबडे बंधूंनी भेट दिली. त्यानंतर दीड वर्षापूर्वी या ठिकाणी ठिबक सिंचन रिसायकलिंग करण्याचा उद्योग सुरू केला. यासाठी उद्योगासाठी आतापर्यंत 70 ते 80 लाख रुपये खर्च झाले. तीनशे मीटर ठिबक सिंचनचे एक बंडल याप्रमाणे 75 बंडलची निर्मिती 12 तासांत होते. शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणाहून जुने ठिबक घेऊन येतात व नवीन ठिबक घेऊन जातात. गेल्या दीड वर्षापासून यशस्वीरीत्या हा उद्योग सुरू आहे. 

पंचवीस जणांना मिळाला रोजगार 

स्वस्त दरात ठिबकचे पाइप मिळू लागल्याने जालना, जाफराबाद, मंठा, आष्टी, परभणी, बीड आदी ठिकाणचे शेतकरी जुने ठिबक देऊन नवीन ठिबक घेऊन जात आहेत. त्यामुळे आपोआपच कामेही वाढल्याने स्थानिक कामगारांचीही गरज पडू लागली. आता या ठिकाणी पंचवीस बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. 

ग्रामीण भागात ठिबक सिंचनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यापूर्वी अनेक शेतकरी जुने ठिबक भंगारात मातीमोल किंमतीत विक्री करत होते. या ठिकाणी जुन्या ठिबकचे रिसायकलिंग करून अल्पदरात नवीन ठिबक बनवून दिले जाते. या उद्योगामुळे या भागातील मजुरांना रोजगार मिळाला आहे. 
- शशिकांत बोबडे, उद्योजक, तीर्थपुरी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telegram: टेलिग्रामवर मोफत चित्रपट आणि वेब सिरीज पाहणाऱ्यांना धक्का! आता फुकट काही पाहता येणार नाही; केंद्र सरकारची मोठी कारवाई

IPL ची 'गुगली'! RCB चा पहिला सामना चिन्नास्वामीवर होईल, असे BCCI ने जाहीर केले खरे; पण, तिथे होईलच याची खात्री नाही

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

SCROLL FOR NEXT