PBN25GPP08 
मराठवाडा

महेबुब खान पठाणच्या मृत्यूने पोलिसांनी सोडला निश्वास

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः पोलिसांना एकदा नव्हे तर तीनदा गुंगारा देऊन फरारी झालेला खून प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला महेबुब खान पठाण याचा बुधवारी (ता.२५) मृत्यू झाल्याने पोलिस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, विद्या देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी महेबुब खान पठाण व दुसरा त्याचा साथीदार वसीम खान पठाण याचा ही यापूर्वीच मृत्यू झाला आहे.महेबुब पठाण यास बुधवारी सकाळी छातीत दुखत असल्याने हर्सूल कारागृह प्रशासनाने घाटी रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.


महेबुब खान पठाण याने २००२-०३ मध्ये परभणीसह परिसरातील तालुक्यात व जिल्ह्यात मोठी दहशत निर्माण केली होती. घरात घुसून चोरी करण्याबरोबरच घरातील एकट्या दुकट्या महिलेवर हल्ला करण्याचे सत्र त्याने अवलंबिले होते. महेबुब खान पठाण हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कित्येक वेळा फरार झालेला आहे. २०१४ मध्ये नागपूर येथे दुखत असल्याने त्यास शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सोबत सलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन तो तेथून फऱार झाला होता. त्यापूर्वी परभणीतुनही फरार होण्यात तो यशस्वी झाला होता. मात्र, नागपूर येथून फऱार झाल्यानंतर त्यास परभणीच्या नवामोंढा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. 

विद्या देशमुखचा केला खून....
शहरातील रामकृष्णनगर भागातील रेल्वेपटरीच्या जवळ असलेल्या घरात रात्री घुसून महेबुब खान पठाण व त्याचा साथीदार वसीम खान पठाण या दोघांनी विद्या देशमुख हिच्या घरात घुसत घरातील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवला होता. त्यावेळी विद्या देशमुख हिने प्रतिकार केल्याने त्याने सर्वांसमक्ष तिचा तीक्ष्ण हत्याराने खून करून तेथून फरार झाला होता. या घटनेनंतर त्याची प्रचंड दहशत शहर व परिसरात पसरली होती. तत्पुर्वी वसीम खान याची ओळख कारागृहातच झाल्याने त्या दोघांनी कारागृहातून पलायन केले होते. पलायन केल्यानंतर बाहेर येताच त्यांनी विद्या देशमुख हिचा खून केला होता. त्यानंतर परभणी पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता. 

भीतीपोटी नागरिकांनी रात्री गस्तीही घातल्या होत्या
नारायण चाळ परिसरात राहणाऱ्या एका महिलेवरही हल्ला केला होता. त्यामुळे तर शहरातील अनेक वसाहतीत त्याच्या भीतीपोटी नागरिकांनी रात्रीच्या गस्तीही सुरू केल्या होत्या. याच काळात तो त्याच्या रहिमनगरातील एका मित्राच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. परभणी पोलिसांनी त्यास पकडून न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यास विद्या देशमुख या युवतीच्या खून प्रकरणा जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सुनावणी दरम्यानही न्यायाधीशांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्नही त्याने केला होता. 

नागपूरच्या कारागृहातूनही झाला होता पसार
पोलिसांना गुंगारा देऊन फरार होणाऱ्या या कुख्यात गुंडाची रवानगी २०१२ यावर्षी नागपूरच्या कारागृहात करण्यात आली होती. त्याच्यासोबत वसीम पठाण हाही शिक्षा भोगत होता. येथेच शिक्षा भोगत असताना आजारी असल्याने त्यास तेथील शासकीय रुग्णालयात त्यास उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तेथून तो पसार झाला होता. फरार झाल्यानंतर हैदराबाद येथे काही दिवस तो राहिला. त्यानंतर तो परभणीत रहिमनगर येथील घरी आल्याची माहिती नवामोंढा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यास अटक केली होती.

डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले 
बुधवारी सकाळी दुखत असल्याने त्यास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यास तपासुन डॉक्टरांनी बुधवारी सकाळी नऊ वाजता त्याला मृत घोषित केले. येथील रहिम नगरमध्ये महेबुब पठाण याचे घर आहे. महेबुब पठाण यास पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT