मराठवाडा

राजकीय पक्षांचे सोळा बॅनर्स, सहा झेंडे जप्त

सकाळ वृत्तसेवा

पैठण (जि.औरंगाबाद) : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर करून निवडणुकीची आचारसंहिता लागू केली आहे. त्यानुसार आचारसंहिता जारी होताच पैठण विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता पथकाने शहरातील राजकीय पक्षांचे सोळा बॅनर्स, सहा झेंडे जप्त करण्याची कारवाई केली. ही माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी शनिवारी (ता.20) पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, "" निवडणूक विभागाने विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी केली आहे. निवडणूक यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. विधानसभा निवडणुकीच्या विविध कामांसाठी एकूण 36 पथकांची स्थापना केली आहे. त्यात निवडणूक खर्च विभाग, आचारसंहिता कक्ष, मतपत्रिका कक्ष, पेड न्यूज कक्ष, नामनिर्देशनपत्र स्वीकृती व छाननी या महत्त्वाच्या कक्षांसह अन्य कक्षांचा समावेश आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकात नगरपालिका मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याकडे शहर, पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी यांच्याकडे ग्रामीण; तसेच उमेदवार नामनिर्देशन पत्र व छाननी कक्षप्रमुख म्हणून भूमी अभिलेख अधीक्षक जयदीप शितोळे या अधिकाऱ्यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.''

विधानसभेसाठी दोन लाख 93 हजार 599 मतदार

विधानसभा निवडणुकीसाठी ता. 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध झालेली मतदारयादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार पुरुष मतदारांची संख्या एक लाख 55 हजार 938, महिला मतदारसंख्या एक लाख 37 हजार 659 आहे. एकूण मतदारसंख्या दोन लाख 93 हजार 599 आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT