घनसावंगी : तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा.
घनसावंगी : तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा.  
मराठवाडा

विम्याच्या नुकसान दाव्यात शेतकऱ्यांचे हाल 

सुभाष बिडे

घनसावंगी (जि.जालना) -  पीकविम्याची कागदपत्रे जुळवाजुळवीत शेतकऱ्यांचे मोठ हाल होत आहेत. यासींधी विमा कंपनीच्या कारभाराबद्दल संशय व्यक्त केला जात असून, याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. 

घनसावंगी तालुक्‍यात मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा विमा काढला होता. त्यामुळे शासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्याआधी शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे आपल्या नुकसानीचा दाव्यांचे अर्ज दाखल करण्याचे सुचविले. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा भरूनहीही नुकसानभरपाई मिळण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. सातबारा, आठ अचा उतारा, विमा भरलेला अर्ज, दाव्यासाठी अर्ज, बॅंक पासबुक यासह अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करून घनसावंगी येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात येऊन रांगा लावून ते भरून देणे, विशेष म्हणजे संबंधित विमा कंपनीचे अधिकारी याकडे फिरकत नाही. त्यांच्या वतीने कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार अर्ज स्वीकारत आहेत. जेव्हा विमा कपंनीचे कर्मचारी येतील, तेव्हा त्यांच्याकडून अर्ज मिळाल्याची पावती देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी व विमा अर्ज दाखल केल्यांची पावती घेण्यासाठी दोनदा ग्रामीण भागातून यावे लागत आहे.

मोठ्या रांगा असल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण दिवस जात आहे. त्यातच पंचनाम्यासाठी शेतात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक शेतात येत असल्याने तेथेही शेतकऱ्यास थांबावे लागत आहे. आपल्या नुकसानीचे क्षेत्र पंचनाम्यात कमी येऊ नये यासाठी शेतकरी शेतात ठाण मांडून आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फोटो जमा करण्यात येत आहेत. त्यामुळे फोटो काढणे त्यांची प्रत मिळविणे ती तलाठी कार्यालयात नेऊन देणे अशा अनेक गोष्टी करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यातच या नुकसानीच्या पिकांना वाळून काढणी व नंतर या शेताची मशागत करून रब्बीची पेरणी करायचा असा प्रयत्न शेतकऱ्यांचा आहे; मात्र पीकविम्याच्या दाव्यात शेतकरी पुरता वैतागला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT